जालना- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव (स) येथील प्रेमीयुगूलाने काल रात्री जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविले आहेत.
जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी शिवारात काल रात्री या प्रेम युगलाने आत्महत्या केले असल्याची शक्यता आहे. आज सकाळी या दोघांचेही मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेले दिसले. कैलास काशिनाथ गवई गल्ली नंबर 3, गांधीनगर रांजणगाव 37 वर्ष, तर मुक्ता रामेश्वर खंडागळे राहणार अष्टविनायक नगर रांजणगाव 34 वर्ष असे या प्रेमीयुगोलाचे वर्णन आहे. दोघेही दुचाकीवरून इथे आले असल्याची शक्यता आहे. मौजपुरी पोलिसांनी मृतदेह खाली काढून उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविले आहेत. दरम्यान या दोघांनाही अपत्य असल्याचे समोर आले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172