जालना- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे मानधन पाडव्यापूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार असून पाडवा गोड होणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती कोमल कोरे यांनी दिली आहे. नारीशक्ती दूध ॲप द्वारे एकूण तीन लाख 714 अर्ज भरण्यात आले होते त्यापैकी दोन लाख 81 हजार 510 अर्ज पात्र ठरले आहेत तर वैयक्तिक आणि इतर मार्गाने एकूण दोन लाख 41 हजार 659 अर्ज भरले होते .त्यापैकी दोन लाख 32 हजार 36 अर्ज पात्र ठरले आहेत. असे दोन्ही मिळून एकूण पाच लाख 13 हजार 546 महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेचा सध्या लाभ मिळत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि सर्वत्रच अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली. वेगवेगळ्या ठिकाणाहून या योजनेचे अर्ज भरले गेले. त्यामध्ये वैयक्तिक, महानगरपालिका ,विविध प्रकारचे पोर्टल, नारीशक्ती दूत ॲप, अशा प्रकारे एकूण पाच लाख 13 हजार 546 अर्ज भरले गेले. त्यापैकी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांनी 1889 अर्ज भरले होते .या अर्जांची प्रत्येकी 50 रुपये रक्कम शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे आणि पाडव्यापूर्वी ही संबंधितांच्या खात्यात जमा होणार आहे. याशिवाय इतर मार्गाने भरलेल्या भरलेल्या अर्जांसंदर्भात पन्नास रुपये मानधनाची कोणीही मागणी न केल्यामुळे त्यांचे मानधन आलेले नाही. पन्नास रुपये मानधन मिळणाऱ्या अंगणवाडी सेविकांची संख्या पुढीलप्रमाणे जालना 265, बदनापूर 178 ,भोकरदन 331, मंठा 123, जाफराबाद 162, परतुर 132 ,घनसावंगी 240, अंबड 260 ,जालना शहर200, अशा एकूण 1889 महिलांना हे पैसे मिळणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मानधन परत करणाऱ्या महिलांची संख्या आता 36 वर पोहोचली आहे .यापूर्वी मिळालेले मानधन परत न करता यापुढे येणारे मानधन आता बंद होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.