जालना -बीड येथे मुख्यालय असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, शाखा जालना या वित्तीय संस्थेला आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मंगळवार दिनांक 12 रोजी नोटीस बजावली आहे. जालना शहरातील कडबी मंडी भागामध्ये ही शाखा आहे . आर्थिक गुन्हे शाखेकडे तसेच ज्या भागात ही शाखा आहे त्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ग्राहकांनी ठेवी परत मिळत नसल्याच्या आणि काही फसवणूक झाल्या संदर्भातील तक्रारी नोंदविल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या बँकेच्या व्यवस्थापकांना स्वतः हजर राहून खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे.
दरम्यान ,जालना शहरातील कडबी मंडी भागामध्ये व्यापारी क्षेत्रात ही ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ची शाखा आहे .मंगळवार दिनांक 12 रोजी या शाखेला कुलूप होते. तसेच शाखेच्या शटरवर ठळक अक्षरांमध्ये ठेवीदार आणि खातेदारच काम करू देत नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे मोघम शब्दांमध्ये आज शाखा बंद राहील असे लिहिलेले होते. परंतु कोणत्या तारखेला आणि किती दिवस ही शाखा बंद राहील असे कुठेही निदर्शनास आले नाही. त्यामुळे ग्राहक, ठेवीदार शाखेकडे येत आहेत आणि बँकेने चिटकवलेली सूचना वाचून निघून जात आहेत. ठेवीदार आणि आणि खातेदारांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलीस प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता लक्ष आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172