Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली? तहसीलदारांना निलंबित होण्याची भीती?
    Jalna District

    जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली? तहसीलदारांना निलंबित होण्याची भीती?

    EdTvBy EdTvMarch 3, 2025No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये जन्म मृत्यूच्या नोंदणीचे पेव फुटले होते. मृत्यूच्या नोंदणी पेक्षा जन्माचे दाखले काढून मतदानासाठी त्याचा वापर केला गेला. या संदर्भात महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाने एक पत्र जारी करून जन्म मृत्यू नोंदणीचे अधिकार हे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना प्रदान केले होते .त्यामध्ये सुधारणा करून उशिरा जन्ममृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आणि या तक्रारीची चौकशी करण्यासाठी गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथक (SIT)एसआयटी स्थापन करण्यात आली.दिनांक 28 जानेवारी ला किरीट सोमय्या यांनी दिलेली ही माहिती( संग्रहित व्हिडिओ)

    या पथकाला जन्म मृत्यूच्या प्रमाणपत्रात मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर यामध्ये सुधारणा करून जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कारवाई पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली होती. दरम्यान जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा अधिनियम 2023 मधील सुधारण्याच्या अनुषंगाने जालना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील तहसीलदारांना हे प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे अधिकार दिले.  त्यानंतर तहसील कार्यालयाच्या स्तरावरून यामध्ये मोठ्या प्रमाणात कुठलीही शहानिशा न करता जन्माचे दाखले दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणा संदर्भात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या हे दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान ते दौऱ्यावर येणारे माहीत होताच जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक 27 जानेवारी 2025 ला एक पत्र काढून जालना, भोकरदन, अंबड, परतुर, उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भातील जन्म मृत्यू प्रमाणपत्राची पडताळणी करून त्याचा अहवाल विना विलंब पंधरा दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा अशा सक्त सूचना दिल्या. परंतु आज या पत्राला एक महिना उलटून गेला आहे तरी देखील एकाही तहसीलदारांनी या संदर्भातील कारवाईचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला नाही.

    या बोगस प्रमाणपत्र वाटप संदर्भात महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तहसीलदार निलंबित झाले आहेत. कदाचित असा प्रकार जालन्यात देखील होऊ शकतो. कारण अशा प्रकारचे प्रमाणपत्र देणारा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका हे टॉप टेन च्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. कदाचित याची सखोल चौकशी झाली तर तहसीलदारांवर मोठी कारवाई होऊ शकते म्हणूनच की काय जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी वेळ काढू धोरण घेतल्याचे दिसत आहे .जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त ताकीद देऊनही उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार हे या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. दुर्लक्ष करण्याचं आणखी एक कारण असं आहे की जून महिना दोन महिन्यावर आला आहे आणि या काळात शासकीय अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होतात. त्यामुळे एकदा अधिकारी बदलून गेला की ते प्रकरण मागे पडते. म्हणूनच की काय? हे अधिकारी जून महिना उजाडण्यासाठी वेळ काढू पणाची भूमिका घेत असल्याचेही दिसत आहे .एकंदरीत काय तर किरीट सोमय्या येवो अथवा देवेंद्र फडणवीस येवो अधिकाऱ्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही.

    ही आहे जालना जिल्ह्याची परिस्थिती जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणपत्र मागितली होती आणि सर्वात जास्त दिलीही आहेत. शासनाच्या अधिकृत यादीनुसार 11491 प्रमाणपत्र मागणीचे अर्ज आले होते. त्यानुसार जालना 2179, बदनापूर 613, भोकरदन,2594, जाफराबाद 2016, अंबड 1853 ,घनसावंगी 1353, परतुर 948, आणि मंठा 941 अशा एकूण 11491 प्रमाणपत्राची मागणी होती. त्यापैकी 7957 प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. 164 प्रमाणपत्र फेटाळण्यात आले आहेत तर विविध कारणांमुळे 3370 प्रमाणपत्र प्रलंबित आहेत.

    महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
    आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

    collector dr. panchal devabhau Ed News jalna news mh live mh news उपविभागीय अधिकारी किरीट सोमय्या जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ तहसीलदार देवाभाऊ बांगलादेशी रोहिंगे
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleमाध्यमिक शिक्षण विभाग रात्री आठ वाजता उघडा कशासाठी? पैसे दिल्याशिवाय काम होत नाही! मराठवाडा शिक्षण संघाचा आरोप!
    Next Article “आपले सरकार “कडून जनतेची लूट!तर महा लॅबमध्ये खोटे रिपोर्ट- ग्राहक संरक्षण परिषदेत सदस्यांचा आरोप
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    June 2, 2025

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    June 2, 2025

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    June 2, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20251,809 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,156 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025720 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025515 Views
    Don't Miss
    Breaking News June 2, 2025

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    जालना- सर्वे नंबर 488 परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोरच दुसऱ्या बाजूला करोडो रुपयांची सार्वजनिक न्यास नोंदणी…

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.