Advertisment
Breaking NewsJalna Districtजालना जिल्हा

कोणी पगार देता का पगार! शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांसमोर पदर?

जालना- शिक्षण विभागात नेहमीच काही ना काहीतरी गोंधळ चालू असतो. मग तो शिक्षकांचे पगारातून कपात केलेले आयकाराची रक्कम हडप करणे असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देखील शिक्षकांचे पगार न झाल्यामुळे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणे असो .अशा अनेक विषयांवरून जिल्हा परिषदेचे दोन्ही शिक्षण विभाग चर्चेत असतात. 14 एप्रिल ला पगार न झाल्यामुळे शिक्षक संघटनेने नुकतेच आंदोलन केले होते. ते आंदोलन संपते न संपते तोच प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी आज अचानक वेतनाचा प्रश्न घेऊन तिन्ही अधिकाऱ्यांसमोर पदर पसरून वेतन देण्याची विनंती केली.

माहे मार्च 2025 चा पगार आज 21 तारीख उजाडली तरी झालेला नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे गृह कर्जाचे हप्ते, विमा कंपनीचे हप्ते, वाहनांचे हप्ते ,अशा अनेक प्रकारची देणे थकलेली आहेत .त्यामुळे विनाकारण व्याजाचा भुर्दंड ही भरावा लागत आहे.या दोन्ही विभागांमध्ये सुमारे 50 कर्मचारी कार्यरत आहेत आणि या सर्वांचा पगार थकलेला आहे .यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा वित्त अधिकारी,आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी या तिन्ही अधिकाऱ्यांच्या  दालनात जाऊन या कर्मचाऱ्यांनी भेटी घेतल्या आणि पगार देण्याची विनंती केली. दरम्यान मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या कार्य कक्षेतील दोन कर्मचारी शिक्षण विभागात ही वेतनाची कामे करण्यासाठी नियुक्त केलेली आहेत .परंतु त्यांच्याकडून या कर्मचाऱ्यांच्या कपाती विषयीचे प्रमाणपत्र वित्त विभागाला न गेल्यामुळे हे पगार थकल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी या विभागाचे विभाग प्रमुख शिक्षणाधिकारी यांची आहे .दरम्यान उद्या या संदर्भात या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button