पोलिस निरीक्षक देविदास शेळके आणि उपनिरीक्षक माने यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश
जालना-अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वादग्रस्त पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्याविरुद्ध वाळू माफियांना अभय दिल्याबाबत कारवाई करण्याबाबतच्या याचिकेला अंबड न्यायालयाने अखेर हिरवा कंदील दिला. दि.४ ऑगस्ट रोजी तब्बल तीन वर्षानंतर पोलीस निरीक्षक शेळके व उपनिरीक्षक माने यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी दि.५ मार्च २०१८ रोजी वाळू तस्करीचा हायवा पकडून ताब्यात घेतला. दरम्यान तत्कालीन पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी मोबाईल वरून माने यांना हायवा सोडून देण्यास सांगितले. त्यानंतर हायवा सोडून देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली. पोलीस प्रशासनाने निरीक्षक शेळके उपनिरीक्षक माने यांना पाठीशी घातल्यामुळे पोलीस निरीक्षक शेळके, उपनिरीक्षक माने यांच्यासह गुन्हेगारांना मदत केल्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने व अन्य चार कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई होण्याबाबत देवानंद चित्राल यांनी अंबड न्यायालयात याचिका दाखल केली होती. दि.४ ऑगस्ट रोजी न्यायालयाने तत्कालीन पोलिस निरीक्षक शेळके उपनिरीक्षक माने यांच्याविरुद्ध १५६ (३) कलम अंतर्गत फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुराव्या अभावी उपविभागीय पोलिस अधिकारी सोनवणे व अन्य चार जणांना क्लीनचिट दिली. एड. श्रीमती आशा दिघे गाडेकर यांनी फिर्यादी पक्षाची बाजू मांडली.
*ताज्या आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app*