Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

वाळूमाफियांकडून तहसीलदारांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

 जालना-जालना तालुक्यातील सारवाडी  येथील कुंडलिका नदीच्या पात्रात जेसीबीद्वारे अवैधरित्या वाळू उत्खनन करून दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांना आज दि .9 रोजी सकाळी 7.30 वा. मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार  श्रीकांत भुजबळ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.तत्पूर्वीच, पथक येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत फुटली आणि वाळू माफियांपर्यंत  ती पोहोचली .तहसीलदार श्री. भुजबळ हे नदीपात्रात उतरून कारवाईसाठी जात असताना जेसीबी चालकाने त्यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तहसीलदार आणि पथकातील कर्मचारी वेळीच प्रसंगावधान राखून इतरत्र पळाले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनेची माहिती कळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर हे घटनास्थळी मोठया फौजफाट्यासह दाखल झाले होते. पोलीस पोहोचण्या अगोदरच वाळूचोर वाहने सोडून पळून गेले होते. याप्रकरणी भुजबळ यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे या कलमाखाली आरोपी विठ्ठल किसन उगले, कृष्णा बाबासाहेब उगले (रा. सारवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button