ह.भ.प.महाराजांनी मिळवली नॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटीची”डॉक्टरेट” पदवी
जालना- नॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटीची “डॉक्टर ऑफ फिलोसोफी- सोशल वर्क” ही पदवी जालना तालुक्यात असलेल्या आनंदगड येथील हरिभक्त परायण भगवान महाराज आनंदगडकर महाराज यांना मिळाली आहे .
दिल्ली येथील इस्कॉन ऑडिटोरियम मध्ये शनिवार दिनांक 18 रोजी हा पदवीदान समारंभ पार पडला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने ही पदवी दिला जाते. या पदवी बद्दल बोलताना ह. भ. प .डॉ. आनंदगडकर महाराज म्हणाले” नॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटी च्या वतीने डॉक्टर “ऑफ फिलोसोफी- सोशल वर्क” ही पदवी आपल्यास मिळाली आहे. आणि ही पदवी मिळवण्यासाठी किंवा कोणतेही कार्य करण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते. म्हणजेच देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये राष्ट्र लागते आणि या राष्ट्रांमध्ये असलेल्या समाजासाठी आपण काही काम करू शकतो का? ही भावना निर्माण होते आणि या भावनेतूनच बंजारा समाज, कैकाडी समाज, वडार समाज, अशा अन्य काही समाजातील बांधवा करिता काही काम करता येईल का? असा प्रश्न पडला आणि त्यांना काही चुकीच्या कामांपासून, व्यसनाधीनते पासून बाजूला सारण्याचा प्रयत्न केला . त्यामध्ये हा समाज 90 टक्के व्यसनमुक्त झाला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार या भागात अशा प्रकारचे मोठे काम झाले आहे. वास्तवतेकडे वळून समाधान आणि शांती चे जीवन ते सध्या जगात आहेत. याच कामाची दखल घेऊन नॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटीने ही पदवी प्रदान केली आहे.
या पदवीदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गीतकार समीर अंजान तर प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक दर्जाचे अध्यात्म गुरु डॉ. अभिराम कुलश्रेष्ठ यांची उपस्थिती होती. दरम्यान पदवी मिळविण्यासाठी केलेल्या कामानंतर भविष्यात आनंद गडावर आणखी काय उपक्रम राबवल्या जाणार आहेत याबद्दल माहिती देताना भगवान महाराज म्हणाले “सूर्यावर जसा सर्वांचाच हक्क आहे तसा राष्ट्र पुरुषांवर देखील सर्वांचा हक्क असतो, त्या भावनेतून आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा पुतळा येथे बसविण्यात आला आहे. त्याच सोबत संत परंपरेतील संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या बरोबरीचे असलेले संत चोखोबा यांचे देखील या दोन्ही संतांच्या बरोबरीचे स्थान आहे, मात्र त्यांचे नाव यांच्या यादीत येत नाही. तो आणण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत .त्यासोबत शेख महंमद हे देखील थोर संत होऊन गेले आणि त्यांच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी त्याचाही पुतळा येथे उभारले जाणार आहे .महिलांमधील झंझावात म्हणून एकमेव धर्मरक्षणासाठी लढलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यापासून देखील महिलांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचाही पुतळा या परिसरात उभारल्या जाणार आहे. यासोबत कर्म व उपासना ज्ञान या भारतीय संस्कृतीच्या घटकांना कायम स्मृतीत ठेवण्यासाठी यावर्षीपासून संगीत महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. आणि उद्या दिनांक 21 पासून तीन दिवसीय संगीत महोत्सव इथे साजरा होणार आहे. आणि लवकरच हाताला काम, मुखाला राम आणि योग्य दाम ,या त्रिसूत्रीचा अवलंब करून परिसरातील विकास कामांना देखील सुरुवात होणार आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna