वाळूचा हायवा चालवाचाय, 26 हजार रुपये दे, मंठा तहसीलचा कारकून जाळ्यात
जालना- वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी हायवा चालू ठेवायचा असेल तर 26 हजार रुपये दे! अशी लाच मागणारा मंठा तहसील चा कारकून लाचेच्या जाळ्यात अडकला आहे .
मंठा तालुक्यात अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते हे जगजाहीर आहे ,मात्र ही सुरू ठेवण्यासाठी देखील लाच मागितली जाते आणि या मध्ये तहसील विभागाच्या कर्मचाऱ्यांचा हात असतो हे आता उघड झाले आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचा वाळू व्यवसायासाठी हायवा वाहन चालते. हे वाहन सुरू ठेवण्यासाठी मंठा तहसील येथील कारकून विठ्ठल बोरकर याने तक्रारदाराकडे 26 हजार रुपयांची मागणी केली आणि सौदाही पक्का झाला. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी या विभागाचे अधिकारी लगेच मंठा येथे दाखल झाले. शहानिशा करण्यासाठी दाखल झालेल्या या पथकाने लगेच सापळा लावला आणि या सापळ्या मध्ये तक्रार दाराकडून 26 हजार रुपयांची लाच घेताना मंठा तहसील चा कारकून विजय बोरकर याला रंगेहात पकडले आहे. प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री ताठे यांनी ही कारवाई केली.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna