सरपंचाचा अंगठा घेताना खाजगी व्यक्ती जाळ्यात
जालना- अंगणवाडी दुरुस्तीचे ग्रामपंचायत कडून मिळणाऱ्या देयकावर सरपंचाचा अंगठा आणि सही शिक्का घेण्यासाठी ३० हजारांची लाच मागणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याच्यावर सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना तालुक्यातील वरखेडा येथे असलेल्या ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी दुरुस्तीचे काम या प्रकरणातील तक्रारदाराने केले होते. कामानुसार तीन टप्प्यात धनादेश काढण्यात आले पहीला धनादेश ३० हजारांचा, दुसरा १६ हजारांचा व तिसरा ३२ हजार ६६८ रुपये .असे एकूण ७८ हजार ३८ रुपयांच्या धनादेशावर गावच्या सरपंचाचा सही आणि शिक्का आवश्यक होता. हा सही शिक्का देण्यासाठी एक तिऱ्हाईत माणूस गणेश शिवाजी बनाईत, ३५, राहणार वरखेडा तालुका जालना. याने 30 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने दिनांक 15 रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आणि या तक्रारीची या विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा करून दिनांक 16 रोजी शिवली येथील बाजार पट्टी भागांमध्ये तीस हजार रुपयांची रोख रक्कम घेताना गणेश शिवाजी बानाईत याला रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक एस. एस. शेख, यांच्यासह मनोहर खंडागळे, गजानन घायवट, गणेश चेके, गजानन भुजाडे, शिवाजी जमदाडे, यांनी ही कारवाई केली.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
-9422219172