कोदा शिवारात वीज पडून महिला ठार, दोघे जण जखमी
जालना- पावसाळ्याला नेमकी सुरुवात झाली आहे अजून पाऊस आला नाही नाही परंतु पावसाळ्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने आणि विजेचा कडकडाट आने एका महिलेचा बळी घेतला आहे आणि दोन जणांना जखमी केले आहे भोकरदन तालुक्यात ही दुर्घटना घडली. प्रचंड उकाड्यानंतर शनिवार दि. ११ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह वीज कोसळून एक महिला दगावल्याची घटना भोकरदन तालुक्याती अनवा गावापासुन जवळच असलेल्या कोदा येथे घडली आहे.
कोदा येथील महिला शेतकरी गंगाबाई पांडूरंग जाधव, मुलगा दत्ता पांडूरंग जाधव, भारती गजानन जाधव हे तिघे मक्याचे भुस झाकण्यासाठी मेनकापड टाकत असतांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वीज पडल्याने गंगाबाई पांडुरंग जाधव वय (५४ ) या महिला जागीच ठार झाल्या, तर मुलगा दत्तात्रय व सुन भारती हे जखमी झाले आहेत. जखमी मुलाला उपचारासाठी सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेस खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
वीज पडून घडलेल्या दुर्घटनेमुळे ऐन पेरणीच्या सुमारास या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात पावसाला सुरूवात झाली. या वादळी वाऱ्यामुळे वाकडी येथील किराणा दुकान व काही शेतकऱ्यांच्या वखार वरील पत्रे उडून गेली असून झाडे उन्मळून पडली आहेत.
दरम्यान हवामान खात्याने जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे नागरिकांनी विशेष करून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com