वा रे पठया! स्वतःसह इतर दोघांसाठीही घेतली लाच
जालना- लाच घेणे आणि देणे दोन्ही गुन्हा आहे परंतु स्वतःसाठी लाच घेणे एखाद्या वेळेस माणूस समजू शकतो, मात्र स्वतःसाठी आणि आपल्या सहकाऱ्यांसाठी देखील लाच घेणारा एक वर्ग दोन चा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
परभणी जिल्ह्यातील मानवत येथील एका माजी सैनिकाला सैनिकी कोट्या मधून पेट्रोल पंप मिळाला आहे. या पेट्रोल पंपाचे नाव देखील फौजी पेट्रोलियमच ठेवले असून तो परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथे आहे. या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मशीनचे दोन नोझल प्रमाणित करून देण्यासाठी त्यांनी अंबड येथील वर्ग दोन चे वैद्य मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक प्रदीप विष्णुपंत येंडे वय 43, राहणार भाग्योदय नगर, सातारा परिसर, बीड बायपास औरंगाबाद यांच्याकडे नियमानुसार मागणी केली. त्या अनुषंगाने प्रदीप येडे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी. त्यामध्ये स्वतःसाठी पाच हजार रुपये, सोबत आणलेला शिपाई कोलते याच्यासाठी दोन हजार रुपये, आणि एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम या कंपनीचा ऑपरेटर फुलचंद जाधव यांच्यासाठी एक हजार रुपये अशा एकूण आठ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. परतुर रस्त्यावरील हॉटेल शेतकरी येथे हा व्यवहार झाला याप्रकरणी प्रदीप येडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा नोंद केला आहे .जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुदाम पाचोरकर, यांच्यासह पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस अमलदार गजानन घायवट, गणेश भुजाडे, प्रवीण खंदारे, गजानन कांबळे, आदींनी हा सापळा लावला होता.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com