रेल्वे स्थानकाजवळ जलवाहिनी फुटली; किराणा दुकानचे लाखोंचे नुकसान ;पाणीपुरवठा लांबणार
जालना- रेल्वे स्थानकाजवळ जालना शहर महानगरपालिकेची जलवाहिनी आज शुक्रवार दिनांक 20 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फुटली आहे .600 मिलिमीटर व्यासाची ही जलवाहिनी जायकवाडी कडून आलेले पाणी जुना जालना भागात असलेल्या विविध जलकुंभामध्ये पोहोचविण्याचे काम करते. मुख्य रस्त्यावर फुटलेल्या या जलवाहिनीमुळे पाण्याचा प्रचंड वेग होता, वेगाने हे पाणी मुजीब किराणा या दुकानांमध्ये गेले आणि या दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नदी नाल्याला लोंढा यावा अशा पद्धतीचे चित्र रात्रीच्या वेळी इथे दिसत होते.
दरम्यान या संदर्भात बोलताना जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी सांगितले की,जलवाहिनी फुटल्यामुळे जुन्या जालन्यातील पाणीपुरवठा एक ते दोन दिवस लांबणीवर पडणार आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम उद्या दिनांक 21 रोजी युद्ध पातळीवर हाती घेण्यात येईल, फुटलेल्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला आहे परंतु जलवाहिनी मध्ये साचलेले पाणी निघून जाण्यासाठी एक ते दोन तासाचा कालावधी लागतो त्यामुळे हे पाणी वाहत असल्याचेही ते म्हणाले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172