मराठवाड्यातील शेतकरी मागास राहणार नाही- समीर अग्रवाल
जालना-कृषी क्षेत्रातील मराठवाड्याचे मागासले पण पुढील तीन चार वर्षात दूर होईल असे भकित कलश सीड्स चे कार्यकारी संचालक समीर अग्रवाल यांनी आज व्यक्त केले.
फळे आणि पालेभाज्याच्या बी- बियाणे संशोधन आणि उत्पादन करणाऱ्या जालन्यातील कलश सीड्स च्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील विविध राज्यातील शेतकरी आणि विक्रेते यांच्यासाठी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बियाण्याविषयी माहिती देताना ते बोलत होते.
महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या मागास भागात बियाणे संशोधन आणि उत्पादन होते, असे असतानाही मराठवाडा हा शेती उत्पादनामध्ये मागासलेलाच आहे मग आपल्या बियाण्यांच्या उत्पादनाचा उपयोग काय? या प्रश्नाला उत्तर देताना समीर अग्रवाल म्हणाले, खरे तर या बियाण्यांची निर्मिती ही मराठवाड्यात आणि जालना शहरातच होते त्याचे उत्पादनही चांगल्या प्रमाणात निघते, परंतु दळणवळणाची साधने आणि बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नव्हता. मात्र आता जालन्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे आता या शेतकऱ्यांना पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी आपला भाजीपाला अल्पावधीत नेऊन विकता येईल .आणि त्यांना चांगले उत्पन्न मिळेल त्यातच गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाणीही मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे भविष्यात मराठवाड्यातील शेतकरी मागासलेला आहे असे म्हणता येणार नाही. आत्तापर्यंत दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे मुंबई पुण्यापर्यंत भाजीपाला नेत असताना अनेक अडचणी यायच्या आणि तो भाजीपाला रस्त्यातच खराब होत होता पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. असेही समीर अग्रवाल यांनी सांगितले.
दरम्यान शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण ,चांगले उत्पादन मिळावे त्यामुळे एकाच वाणांमध्ये अनेक गुणधर्म असणारे बियाणे उत्पादन करण्यासाठी कलश सीड्स सदैव तत्पर असल्याचेही ते म्हणाले. बियाण्यांचे संशोधन आणि उत्पादन केंद्र हे जालन्यात असले तरी देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील शेतकरी आणि विक्रेत्यांपर्यंत उत्पादनाची माहिती व्हावी म्हणून यावर्षीपासून चार ठिकाणी अशा प्रकारचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये दिल्ली जवळील पानिपत, वाराणसी, बेंगलोर आणि जालना ही ठिकाणी निवडण्यात आली आहेत. त्यामुळे त्या -त्या भागातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पिकाची माहिती घेऊन आपले उत्पादन वाढवून भरघोस नफा कमवता येईल असेही त्यांनी सांगितले.आज विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली आणि नवीन बिबियाण्याची आणि उत्पादनाची माहिती घेतली.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com