“तो” कैदी सापडला:त्याला सतावत होती परिवाराची ओढ; आष्टी पोलिसांनी पकडले
आष्टी -जालना येथील जिल्हा कारागृहातून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे 17 सप्टेंबरला सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका कायद्याने धूम ठोकली होती. 30 फूट उंचीवरून चादर आणि अन्य कपड्यांच्या साह्याने तो पळून गेला होता. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 18 सप्टेंबरला गुन्हाही दाखल झाला होता.
त्यावेळेस पासून पोलिसांची विविध पथके या आरोपीचा शोध घेत होती. आज दिनांक 21 रोजी आष्टी पोलिसांनी कैदी तुळशीराम मुरलीधर काळे, राहणार बाजार गल्ली आष्टी,ता.परतूर याला एका उसाच्या फडातून सकाळी सहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.
तुळशीराम काळे हा मूळचा आष्टी येथील रहिवासी आहे .त्यामुळे निश्चितच तो याच भागात येईल अशी अपेक्षा पोलिसांना होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले जाळे टाकले आणि आष्टी परिसरात असलेल्या उसाच्या फडामधून एका खबऱ्याने तुळशीराम काळे हा सकाळच्या वेळी चहा पिण्यासाठी फडाच्या बाहेर येतो म्हणून माहिती दिली. ही माहिती मिळतात आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके हे कामाला लागले स्वतः एका मुस्लिम समाजाच्या वेशभूषेत आणि त्यांचे सहकारी राणोजी पांढरे यांनी गळ्यात खाकी रंगाची मफलर अडकवली, विनोद वाघमारे यांनी निळा शर्ट घालून शर्टाचे बटन उघडे ठेवून एका त्रयस्थ माणसाची भूमिका केली, आणि भीमराव राठोड हे सामान्य माणसांप्रमाणे या परिसरात घुसले . त्यामुळे हे पोलीस आहेत याची कोणाला शंका आली नाही . सकाळी संकनपुरी भागात असलेल्या उसाच्या फडातून तुळशीराम काळे बाहेर येताना दिसला आणि बाजूच्या एका आखाड्यावर दबा धरून बसलेल्या या पथकाने त्याला सर्व बाजूंनी घेरले आणि आष्टी पोलीस ठाण्यात आणले. आहे दरम्यान आपल्याला पत्नीची मुलीची आठवण येत होती म्हणून कारागृहातून पळ काढल्याचे काळे याने सांगितले आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172