भोकरदन तालुक्यात सुमारे एक एकर शेतातील गांजा पोलिसांनी पकडला
भोकरदन-तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांनी आज दि.21 धाडसी कारवाई केली. तालुक्यातील कल्याणी शिवारातील एक एकर क्षेत्रावरील गंज्याच्या शेतीमधील पीक जप्त केले आहे.बाजारात याची लाखो रुपये किंमत आहे. कठोरा बाजार येथील एका इसमाने कल्याणी शिवारात एक एकर शेतामध्ये गांजाची झाडे लावून शेती केली असल्याची माहिती सपोनि. गुसिंगे यांना मिळाली होती.
आज त्यांनी मोठ्या फौजफाट्यासह नायब तहसीलदार पप्पूलवाड, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेत या शेतावर धाड टाकली.यावेळी पोलीस, पोलिसांनी खाजगी मजूर लावून अक्षरशः या शेतातील गांजाच्या झाडांची मोजणी करून, ते उपटून घेतले. त्यानंतर एका ट्रॅक्टरमधून बंदोबस्तात ही गांजा झाडे पारध पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहेत. ही एकूण झाडे अंदाजे साडेपाचशे पेक्षा जास्त असून, एका ओल्या झाडाचे वजन पाच ते साडेपाच किलो आहे. पारध पोलीस ठाण्याचे सपोनि. चैनसिंग गुसिंगे, पोलीस उपनिरीक्षक विलास गुसींगे, पोलीस उपनिरीक्षक विजय आहेर, नायब तहसीलदार पप्पुलवाड, तलाठी सोनूने, पोहेकाँ. सिनकर , सरडे, खिल्लारे, गणेश पायघन, शिवाजी जाधव, नितेश खरात, संतोष जाधव, शरद शिंदे, महिला पोकाँ. कविता बारवाल, रुपाली नरवाडे, कृष्णा गवळी व होमगार्ड तेलंग्रे, बोडखे, खरात, लोखंडे, जाधव आदींनी या छाप्यामध्ये सहभाग घेतला.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172