ऑक्सीजन देणाऱ्या तुळस नावाच्या मशीनचे शास्त्र आपण विसरलो; राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या कानपिचक्या
जालना -तुळस ही ऑक्सिजन देणारी मशीन आहे. परंतु आजच्या परिस्थितीत तिला आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कुंडीमध्ये बंद करून ठेवलं आहे. त्याचसोबत ऑक्सिजन देणाऱ्या तुळस नावाच्या मशीनचे शास्त्र देखील आपण विसरलो आहोत. अशा कानपिचक्या कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी घेतल्या आहेत. त्यासोबत निरोगी आयुष्य जगायचे असेल तर, इतर झाडांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त ऑक्सिजन देणाऱ्या बांबूची लागवड करा असे आवाहनही त्यांनी केले. पाशा पटेल हे आज डॉ. सुयोग कुलकर्णी यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते.
यावेळी छोटेखाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. बांबू लागवडी संदर्भात पाशा पटेल यांनी सविस्तर माहिती दिली तसेच त्याचे महत्त्वही विशद केले. त्यासोबत बांबूमध्ये असलेले गुणधर्म शोधण्यासाठी केंद्र सरकारने 1000 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांसह एडवोकेट सुरेश कुलकर्णी, रमेश देहडकर आणि प्रगतशील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172