शोधनिबंधांचे पुस्तक प्रकाशित करणार-प्राचार्य डॉ.गायकवाड
जालना- वंशवाद, प्रांतवाद, सामाजिक न्याय या विषयांवर देखील चर्चा व्हायला हव्यात ,असा सूर अंबड येथील मत्सोदरी शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित (19-20 जाने2024) दोन दिवशीय राष्ट्रीय परिसंवादातून निघाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मत्सोदरी महाविद्यालयाच्या वतीने “वसाहतवादोत्तर स्थित्यंतरे ,हक्क आणि न्याय यांचे समकालीन इंग्रजी साहित्यातील प्रतिबिंब “या विषयावर पार पडला .या परिसंवादाचे बीजभाषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मुस्तजीब खान यांनी केले.
दोन दिवस चाललेल्या या परिसंवादामध्ये सुमारे 100 संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. या सर्व शोधनिबंधांचा अभ्यास करून यावर एक पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शहाजी गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. तसेच असे उपक्रम घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या, संस्थेच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यासोबत मागील तीन महिन्यांमध्ये “पर्यावरण क्रीडा” “प्राणीशास्त्र” इंग्रजी साहित्य या विषयांवर देखील परिसंवाद झाल्याचे त्यांनी सांगितले. या परिषदेसाठी इतर राज्यातील अनेक मान्यवर येण्यासाठी तयार होते, परंतु आपल्या विद्यापीठात देखील गुणवत्तापूर्ण मान्यवर आहेत त्यामुळे त्यांचा सन्मान ,त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून याच विद्यापीठातील मान्यवरांना बोलावण्याचे त्यांनी सांगितले.
19 जानेवारी 2024
* स्वागतपर भाषण- मुख्यसंयोजक, प्राचार्य डॉ. शहाजी गायकवाड . बीज- भाषण: प्रा. डाॅ. मुस्तजीब खान, विभागप्रमुख, इंग्रजी विभाग,डाॅ. बा. आं. म. विद्यापीठ छ. संभाजीनगर. प्रमुख वक्त्या: 1) प्रा. डाॅ. मेहरूनीसा, इंग्रजी विभाग, डाॅ.बा. आं. म. विद्यापीठ पठाण2)प्रा. डाॅ. प्रज्ञा काळे, नेहरू महाविद्यालय, छ. संभाजीनगर.
या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डाॅ. दिगंबर दाते यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. विशाल खरात यांनी केले.*दुसरे सत्र ( शोधनिबंधवाचन)
यात प्रा. श्रीमती बियाणी व प्रा.श्रीमती अहूजा यांच्यासह इतर अनेक संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.अध्यक्ष- डाॅ. प्रदीप जाधव,प्रमुख वक्ते- डाॅ. राजक्रांती वलसे,सुत्रसंचलन प्रा. सुशीला बचाटे तर आभारप्रदर्शन प्रा. शरद खोजे
दि. 20 जानेवारी, 2024* या सत्राच्या प्रारंभी डाॅ. दिगंबर दाते यांनी आसामी लेखक येशो दोर्रजी थोगंची यांची इंग्रजीत अनुवादित व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी ” मुकं ओठं, बोलकं र्हदय” यावर आधारीत ” उपेक्षित आदिवासी समाजाचे जीवन आणि संस्कृती” यावर आधारीत अभ्यासपूर्ण शोधनिबंध इंग्रजीत सादर केला.
* दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारच्या समारोप समारंभात उमरगा येथील आदर्श वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व ‘लॅगलीट’ या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन इंग्रजी नियतकालिकाचे संपादक डाॅ. प्रशांत मोटे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.या सेमिनारचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शहाजी गायकवाड यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सुशीला बचाटे तर आभार सेमिनार चे आयोजक प्रा. शरद खोजे यांनी मानले.
या राष्ट्रीय सेमिनारच्या यशस्वीतेसाठी संयोजन समिती सदस्य: उपप्राचार्य ज्ञानेश्वर उबाळे, पर्यवेक्षक प्रा.पांडुरंग काळे, प्रा. शरद खोजे, प्रा. दिलीप जाधव, डाॅ. दिगंबर दाते, प्रा. विशाल खरात, श्रीमती सुशीला बचाटे, अंजली डंगारे आणि सर्व समीती प्रमूखांनी विशेष परीश्रम घेतले
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172