ज्ञानेश्वर नाडे अर्ज खरेदी करणारे पहिले ग्राहक ; 34 उमेदवारांकडून 97 अर्जाची खरेदी
जालना- लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून अर्ज खरेदी करणारे ज्ञानेश्वर दगडूजी नाडे हे पहिले ग्राहक ठरले आहेत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच नामनिर्देशन पत्रासाठी विक्री कक्ष स्थापन करण्यात आला आहे .इथे संजय बारोटे अव्वल कारकून, उद्धव मिसाळ महसूल सहाय्यक आणि गजानन खरात महसूल सहाय्यक हे तिघेजण ठाण मांडून बसले आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रक्रिया गुरूवार, दि. 18 एप्रिलपासून सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नामांकन अर्ज दाखल करणे ते मतमोजणीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली आहे. इच्छुकांना दि. 25 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 26 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 29 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 13 मे रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
इच्छुकांना ऑफलाईनसह सुविधा संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी कोरे अर्ज मिळणे, अनामत रक्कम स्वीकारणे, नामांकन अर्ज स्विकारणे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172