जालना- तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी परतुर तालुक्यातील आसनगाव येथील दोन म्हाताऱ्यांना वीस वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनीही शिक्षा ठोठावली.
सविस्तर प्रकरणअसे की, या प्रकरणातील पहिला आरोपी बालासाहेब सूर्यभान खरात ,55 वर्ष, राहणार आसनगाव तालुका परतुर यांनी गावातीलच एका 13 वर्षाच्या मुलीला दिनांक 23 जुलै 2023 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास काहीतरी लालूच दाखवून आपल्या घरी बोलावले आणि तिला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा अत्याचार होत असताना तेथीलच या प्रकरणातील दुसरा आरोपी भानुदास गणपत नाटकर वय 57 वर्ष राहणार आसनगाव तालुका परतुर याने पाहिले. आणि तो देखील हे प्रकरण दाबण्यासाठी मुलीला बोलण्याचा प्रयत्न करू लागला. पहिली घटना घडल्यानंतर मुलगी घरी गेली आणि प्राथमिक माहिती म्हणून शेजारच्या महिलेच्या फोनवरून वडिलांना फोन लावला. वडील घरी येण्यास वेळ होता म्हणून जवळच असलेल्या वॉटर फिल्टर वरून पाणी आणण्यासाठी ही मुलगी आपल्या मैत्रिणी सोबत गेली. त्यावेळी वॉटर फिल्टर मध्ये कार्ड टाकल्यानंतर येणारे पाणी येत नव्हते कारण ते आत मधून बंद केलेले होते. नळ बंद असल्याचा बहाना करून भानुदास नाटकर यांनी मुलीला आत मधून पाणी देण्याचा बहाना करून तिला मध्ये बोलवले आणि तिच्यासोबत लैंगिक छळ केला. तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीला त्याने बाहेरच उभे केले होते. एकाच दिवशी अवघ्या दोन तासाच्या अंतरामध्ये या मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणानंतर आष्टी पोलीस ठाण्यामध्ये या दोघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा pocso अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि आष्टी पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोग्यता विधींना जयश्री सोळंके यांनी काम पाहिले त्यांनी एकूण सात साक्षीदार तपासले आणि न्यायालयात युक्तिवाद केला सरकारी अभियोगत्याचे साक्षी पुरावे ग्राह्य धरून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी भानुदास नाटकर आणि बाळासाहेब खरात या दोघांना वीस वर्षं कारावास आणि बारा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सविस्तर बातमी वाचनासाठी खालील पर्याय
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172