Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

“या” दोन्ही नेत्यांची धडधड वाढली ; तीन तासाच्या सुनावणीनंतर निर्णय रात्री नऊ वाजता

जालना- महाआघाडीचे जालन्याचे उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल यांनी काल 29 रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर आक्षेप घेतला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक असताना त्यांनी उचललेले मानधन आणि घेतलेले विविध भत्ते याचे विवरण मिळावे अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा उपनिबंधकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना तात्काळ पत्र दिले आणि माहिती उपलब्ध करून देण्यास सांगितले. परंतु ही माहिती त्यांना मिळाली नसल्याची तक्रार गोरंट्याल यांनी केली होती. यासंदर्भाच्या आक्षेपावर आज दुपारी दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी सुरू होती. परंतु कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे सायंकाळी पाच वाजता हा निकाल राखून ठेवण्यात आला. जो आता रात्री नऊ वाजता देण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत या दोन्ही उमेदवारांची धडधड वाढली आहे.  भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार भास्कर दानवे यांनी “मी पुन्हा येणार” असे सांगितले आहे सविस्तर बातमी पहा व्हिडिओमध्ये.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button