जालना- बांगलादेशात होत असलेल्या अल्पसंख्यांक हिंदू वरील अत्याचाराच्या संदर्भात देशभरात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात काल जवळपास सर्व तालुक्यांमध्ये या घटनेचा निषेध करणारे निवेदन संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे .हिंदू समाजाच्या वेगवेगळ्या संघटना एकत्र येत अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आले आणि मोर्चेही काढण्यात आले. आज दिनांक 11 रोजी शिंदे सेनेच्या वकील संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले आहे आणि बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत, त्यासोबत तेथील वकिलांना मग तो कोणत्याही समाजाचा असो, अल्पसंख्याकांना संरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर विधीज्ञ संभाजी चुनखडे, अभिषेक सतकर, सुनील किनगावकर, हरिदास लांडे ,प्रदीप जाधव, जे. एस. भुतेकर, किशोर राऊत ,बी. एम. कुलकर्णी, पी. एन. परिहार .आदींच्या सह्या आहेत.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172