Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पहिल्याच बैठकीतील पहिल्याच निर्णयाचे तीव्र पडसाद; शेळ्या- मेंढ्यांचा कत्तलखाना सुरू करण्याचा निर्णय ?
    Jalna District

    पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पहिल्याच बैठकीतील पहिल्याच निर्णयाचे तीव्र पडसाद; शेळ्या- मेंढ्यांचा कत्तलखाना सुरू करण्याचा निर्णय ?

    EdTvBy EdTv05/02/2025Updated:05/02/2025No Comments2 Mins Read1 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना -जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एक फेब्रुवारीला जिल्हा नियोजन व विकास समितीची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावित केलेल्या निर्णयावर जालन्यात आता तीव्र पडसाद उमटायला लागले आहेत. दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेमध्ये श्रीमती मुंडे म्हणाल्या होत्या की” शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी मराठवाड्यातील चार  जिल्ह्यांमध्ये शेळ्या मेंढ्यांचे कत्तलखाने सुरू करण्याचा विचार आहे. जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांना यापासून उत्पन्न मिळेल, तसेच जालना शहरात सुरू होत असलेल्या ड्रायपोर्टमुळे कत्तलखाण्याचा व्यवसाय वाढवून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. हा निर्णय प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्यानंतर याचे सर्वच स्तरातून तीव्र पडसा द्यायला लागले आहेत.

    जालना जिल्ह्यामध्ये अहिंसेची शिकवण देणारा जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे. एवढेच नव्हे तर जैन समाजाचे महान तपस्वी श्री गणेशलालजी म.सा. यांचे इथे समाधीस्थान आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यातूनही अनेक भाविक इथे दर्शनाला येतात. रामदास स्वामींची जन्मभूमी असलेल्या जांब समर्थ देखील याच जिल्ह्यात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पदस्पर्शाने नव्हे तर त्यांच्या उपस्थितीमध्ये पुरातन राम मंदिर देखील जालना शहरातच उभारला गेलं आहे . मराठवाड्यात सर्वात जास्त गोशाळा या जालना जिल्ह्यात आहेत. जालना जिल्हा ही अनेक संतांची जन्मभूमी आहे. जालना जिल्ह्याचा आराध्य दैवत असलेल्या आणि पंढरपूरचे प्रतीक पांडुरंग म्हणून आनंदी स्वामी महाराजांचा मठ देखील जालना शहरातच. देवदैवतांचा तर विषयच नाही. अशा या पावनभूमीमध्ये शेळ्या- मेंढ्यांची कत्तल होणे ही संताप जनक बाब समोर यायला लागलीआहे. त्यामुळे या सर्व गोष्टीला विरोध करण्यासाठी आज सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना या कत्तलखाण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी हे निवेदन स्वीकारले.

    दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई येथील समस्त महाजन ट्रस्ट पर्यावरण जतन, संवर्धन करत आहे. नद्या- नाल्यांची रुंदी, खोली वाढवणे, त्यांची स्वच्छता करणे ,शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करून देणे, जलसाठ्यांची देखभाल दुरुस्ती करणे. या सर्व कामांमध्ये सध्या समस्त महाजन ट्रस्ट अग्रेसर आहे .या ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई यांनी देखील या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर भविष्यात कुठल्याही स्तरावर जाऊन हा निर्णय थांबवणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. हिंदू महासभा तर अशा विषयांमध्ये नेहमीच आक्रमक असते या महासभेचे पदाधिकारी धनसिंग सूर्यवंशी यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना थेट भावनिक आवाहन करून जालना शहरात सध्या सुरू असलेले उघड उघड मटणाची दुकाने ही का कमी आहेत का? असे म्हणत कत्तलखाना जर झाला तर आंदोलन छेडण्याचा ही इशारा दिला आहे.

    सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
    आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
    -दिलीप पोहनेरकर-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    dpdc ed jalna live jalna nic Kids cambridge school mh live mh news pfc classes कत्तलखाना जालना जिल्हा पालकमंत्री जालना जिल्हाधिकारी जालना बातम्या जिल्हा नियोजन व विकास समिती देवाभाऊ नूतन देसाई पालकमंत्री पंकजा मुंडे भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकशाही शेळ्या मेंढ्या समस्त महाजन ट्रस्ट
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleजि.प.शाळेच्या 50 विद्यार्थ्यांना मिळणार बुंग… मधून प्रवास करण्याची संधी; जिल्हाधिकाऱ्यांच्या महादीप प्रकल्पाचे फलित
    Next Article आम्हाला हेच शिक्षक पाहिजेत! जि.प. शाळेच्या विद्यार्थिनी सीईओ समोर रडल्या
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/2026

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    07/02/2026

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    22/12/2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,083 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,109 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,246 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,216 Views
    Don't Miss
    Breaking News 10/02/2026

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जालना-गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले…

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    सागर धानुरेच्या हत्येची 25 लाखांमध्ये सुपारी, पंधरा दिवसांपूर्वी शिजला कट

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.