जालना-जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांचे निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजीत करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला गणेश महाडीक, निवासी उपजिल्हाधिकारी, श्रीमती.सरिता सुत्रावे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), श्रीमती.मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी (मग्रारोहयो), श्रीमती.प्रणाली तायडे, तहसीलदार (संगायो), दिपक काजळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जालना यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर प्रशिक्षणादरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत विविध आपत्ती संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच पुर परिस्थिती, आग, वीज पडणे, सर्पदंश, वज्राघात, भूकंप आदी विविध आपत्ती मध्ये काय करावे, काय करु नये याबाबत माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर प्रथमोपचार कसा करावा, डोक्याला झालेल्या इजेवर करावयाचे पट्टी, हाताला झालेल्या दुखापतीमध्ये साधी/त्रिकोणी/गळा मनगट झोळी आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तदनंतर माधव पानपट्टे, अग्निशमन अधिकारी, जालना शहर महानगरपालिका यांचेमार्फत प्राथमिक आगीपासून बचाव तसेच घरगुती गॅस सिलेंडर बाबत मार्गदर्शन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणामध्ये आगी पासून सुरक्षेकरिता रंगीत तालीम आणि अग्निशमन यंत्राचा उपयोग कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे मनोज जाधव, समन्वयक EMS (१०८ रुग्णवाहीका) यांचे टिममार्फत CPR/प्रथमोपचार बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या अंतर्गत
घरगुती व प्राथमिक स्वरुपाची आग कशी विमोचन करावी, यामुळे होणारी जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक स्वरुपाचे आग विमोचन व अग्निशमन विभागातील विविध साहित्याद्वारे आगीवर कशा प्रकारे नियंत्रण केले जाते याबाबत प्रात्यक्षीक करण्यात आले. तसेच उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांना अग्निशमन यंत्र कसे हाताळावे याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.