Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!

    “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!
    Breaking News

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    EdTvBy EdTv24/06/2026No Comments3 Mins Read1,876 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-गेल्या तीन वर्षांपासून रेवगाव येथील शेतकरी लक्ष्मण कदम यांना वेगवेगळे आदेश काढत जालनाच्या तहसीलदारांनी झुलवत ठेवले. त्यामुळे प्रकरण मिटले तर नाही उलट वाढत गेले. याचा परिणाम शेवटी शेतकऱ्याने 12 जूनला विष पिऊन आत्महत्या करण्याचे हत्यार उपसले आणि शेतातच उपोषणाला बसले. त्यानंतर स्वतः तहसीलदारांनी उपस्थित राहून 20 तारखेला आपण शेतातील नाला मोकळा करून देऊ असे लेखी आश्वासन दिले. 20 तारखेला सहा होमगार्ड ,एक पोलीस कर्मचारी घटनास्थळावर ठाण मांडून होते. परंतु सकाळी हजेरी लावून गेलेले तलाठी आणि मंडळ अधिकारी दिवसभर इकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने आपल्या परिवारातील सुमारे 20 मुलसह सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकाऱ्यांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर  जिल्हाधिकाऱ्यांनी  नायब तहसीलदारांमार्फत तहसीलदारांना नोटीस काढून 24 तारखेला या प्रकरणात कायदेशीर कारवाई करा, अन्यथा तिथे जर बरी वाईट घटना घडली तर याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदारांवर असेल असे स्पष्ट आदेश दिले. 

    या आदेशामुळे गेल्या तीन वर्षांपासून जे काम करायची तहसीलदारांची इच्छा नाही ते काम आता करावे लागेल हे निश्चित झाले. त्यामुळे आज दिनांक 24 रोजी हे काम करून देण्याऐवजी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत पुन्हा नवीन आदेश काढला. हा आदेश देखील अजबच आहे. आज दिनांक 24 आहे. आणि पत्रात दिल्याप्रमाणे आज दिनांक 25 रोजी माझ्या सही शिक्क्याने हा आदेश काढण्यात आला आहे आणि दिनांक 24 रोजी दुपारी साडेतीन वाजता माझ्या समक्ष उपस्थित राहावे असे म्हटले आहे. आदेश उद्याच्या तारखेचा आणि हजर राहायचे आजच्या तारखेत? याचा संताप येईल का आश्चर्य वाटेल?

    खरं तर याच तहसीलदारांनी  गेल्या वर्षी देखील याच ठिकानाची पाहणी केली होती. त्यांच्यासोबत तलाठी आणि मंडल अधिकारी देखील होते. सत्य परिस्थिती पाहिल्यानंतर नाला मोकळा करून देण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु कार्यालयात आल्यानंतर पुन्हा वेगळे आदेश काढले. हे आदेश देखील अजबच आहेत. स्वतः तहसीलदारांनी दोन वेळेस पाहणी केल्यानंतर पुन्हा मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना घटनास्थळाची स्थळ पाहणी करण्याचे आदेश काढले. यामध्ये मागील तीन वर्ष वाया गेले आहेत.

    आता जेव्हा हे प्रकरण आपल्या हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याची मुस्कटदाबी करून त्यालाच नोटीस पाठवून गेल्या दोन वर्षांपासून पडीक असलेल्या शेतात तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे उत्पन्न न निघाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झालेला असताना त्यालाच दहा हजार रुपयांची नोटीस पाठवली आहे. 

     

    आता जिल्हाधिकाऱ्यांनीच प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिलेले असताना, हे प्रकरण आपल्या हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यामुळे तहसीलदारांनी पुन्हा ही नवीन नोटीस देऊन इतके दिवस शेतकऱ्याला झुलवत ठेवले होते . तहसीलदारांच्या या पत्रामुळे कोण जिल्हाधिकारी? मी म्हणेल तोच आदेश असाच अर्थ निघायला लागला आहे. परंतु प्रकरण निकाली न निघाल्यामुळे शेतकरी उपोषणाच्या वेळी दिलेल्या निर्णयावर ठाम आहे. 

    सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
    ■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
    ■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    ■दिलीप पोहनेरकर,
    9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    #जिल्हाधिकारी जालना#तहसीलदार जालना#उपजिल्हाधिकारी जालना#पोलीस अधीक्षक जालना#शेतकरी आत्महत्या #ed news #crime news #jalna news #रेवगाव#
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleउद्यापासून शाळा एकाच सत्रात
    Next Article तहसीलदारांनी वीज कंपनीला केले रस्त्याचे अर्पण!; शेतकरी परिवार करणार तहसीलदारांना देहांच समर्पण!
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!

    07/08/2026

    “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?

    06/08/2026

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    18/07/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,121 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,137 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,219 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,145 Views
    Don't Miss
    Breaking News 07/08/2026

    एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!

    जालना- सेवानिवृत्तीनंतर आपल्या हक्काचे पैसे मागायला गेलेल्या कर्मचाऱ्याला जुन्या सहकाऱ्यांनी धनादेश देण्यासाठी त्रास दिला. एवढ्यावरच…

    “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!

    “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    Most Popular

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    एकाने लावले पिस्टल तर दुसऱ्याने लावला चाकू; वसुंधरा नगरात भरदिवसा थरार

    09/05/20210 Views

    मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त

    09/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.