Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » वय वर्ष 24; व्यवसाय हिवरा (राळा)येथे बोगस डॉक्टरकी
    Jalna District

    वय वर्ष 24; व्यवसाय हिवरा (राळा)येथे बोगस डॉक्टरकी

    EdTvBy EdTv10/06/2023No Comments2 Mins Read1 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू करण्यासंदर्भात दिनांक 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने मागील महिनाभरात अशा डॉक्टरांची शोध मोहीम सुरू होती आणि ते बोगस असल्याची खात्री करणे ही सुरू होते. त्यातूनच बदनापूर तालुक्यातील मौजे हिवरा(राळा) येथे एक 24 वर्षाचा बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानुसार या पथकाने काल दिनांक नऊ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील मौजे हिवरा(राळा) येथे या बोगस डॉक्टरच्या घरावर छापा मारून त्याला अटक केली आहे. सुमन कैलास विश्वास वय 24 वर्ष राहणार बोरगाव जिल्हा उत्तरचोबिस, परगाना (पश्चिम बंगाल) असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे.

    बदनापूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी योगेश विनायकराव सोळंके यांनी चंदनजीरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वरिष्ठांच्या आदेशानुसार बोगस डॉक्टरांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहेत .त्यानुसार दिनांक 9 जून रोजी बोगस डॉक्टर समितीच्या अध्यक्षा गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती राठोड ,आरोग्य सहाय्यक सुदेश वाठोरे, डॉ. विशाल सोळुंके वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेलगाव, यांनी चंदनजीरा पोलीस ठाण्यात येऊन या बोगस डॉक्टरवर छापा टाकण्याची सविस्तर माहिती दिली .त्या अनुषंगाने पोलिसांनी या भागाचे बीड अंमलदार श्री. बहुरे, पंच म्हणून श्रीमती एस.के.अष्टीकर ग्रामसेविका हिवराळा व ग्रामपंचायत हिवराळा येथील संगणक परिचारक शिवाजी जनार्दन मडके यांना घेऊन दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हिवरा (राळा) या गावात पोहोचले .खाजगी वाहन घेऊन गेल्यामुळे हे वाहन इतर ठिकाणी उभे केले आणि श्रीराम नारायण मडके यांच्या घरात राहणाऱ्या या बोगस डॉक्टरची तपासणी करण्यासाठी सर्वजण त्याच्या खोलीकडे गेले .त्यावेळी खोलीला आत मधून कडी लावलेली होती. कडी वाजवल्यानंतर या बोगस डॉक्टरने दार उघडले त्यावेळी त्याला घेराव घालून सर्वांची ओळख करून दिल्यानंतर त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी असलेले प्रमाणपत्र आणि इतर परवानगी आहे का? असे विचारले असता त्याने कोणतेही प्रमाणपत्र दाखविले नाही. त्यामुळे त्याच्या खोलीची झडती घेतली असता विविध कंपन्यांची औषधे, इंजेक्शन आणि अन्य वैद्यकीय साहित्य सापडले ,आणि ते पंचा समक्ष जप्त केले आहे. त्यानंतर चंदंनजिरा पोलीस ठाण्यात येऊन कोणतेही वैद्यकीय क्षेत्राची पदवी अथवा प्रशिक्षण न घेता स्वतः डॉक्टर असल्याचे भासून हिवरा (राळा) येथील व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांवर उपचार करीत असताना व रुग्णांसाठी लागणारे औषध, गोळ्या, इंजेक्शन, सलाईन, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीने जनतेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बाळगत असताना मिळून आला .त्यामुळे बोगस बंगाली डॉक्टर सुमन विश्वास याच्याविरुद्ध भादवि कलम 420 अन्वये, वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 1961 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

    गुण येतो का?असे बोगस डॉक्टर कमी खर्चात उपचार करतात,आणिआवश्यकतेपेक्षा पेक्षा जास्त  क्षमतेच्या औषधींचा वापर करतात ,त्यामुळे रुग्णाला तात्पुरता फरक पडतो .परंतु अनावश्यक औषधीचा वापर झाल्यामुळे त्याचे कांही दिवसांनी दुष्परिणाम दिसायला लागतात.

    दिलीप पोहनेरकर
    9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    Bogus Doctor tho बोगस डॉक्टर हिवरा राळा
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article“समृद्धी” वर अपघातात “वृद्धी” ;आज पुन्हा अपघात, एक जण ठार
    Next Article “अमृतवन”ची अवस्था बिकट; बाटलीने पाणी घालून झाडे जगविण्यासाठी नागरिकांचा खटाटोप
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/2026

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    07/02/2026

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    22/12/2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,083 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,109 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,246 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,216 Views
    Don't Miss
    Breaking News 10/02/2026

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जालना-गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले…

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    सागर धानुरेच्या हत्येची 25 लाखांमध्ये सुपारी, पंधरा दिवसांपूर्वी शिजला कट

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.