…आलो इथे रिकामा बहरून जात आहे !असं म्हणत सव्वा कोटींच्या घराचे दान करणारे दांपत्य
जालना -जालना-“आलो इथे रिकामा बहरून जात आहे.. असं म्हणत आयुष्यभर जमवलेली जमापुंजी मी लागावी म्हणून सव्वा कोटींचं घर दान करण्याचा संकल्प जालन्यात एका दांपत्याने केला आहे एवढेच नव्हे तर पुढील पिढीला देखील दातृत्वाची जाणीव असावी हा संदेश देऊन त्यांनी करोडोंची माया जमविणाऱ्या मायाळूंसाठी विचार करायला लावणारा संदेश दिला आहे आणि फक्त आपणच सुखी न राहता आपला शेजारी सुखी राहायला पाहिजे वंचित वंचिताला देखील आपल्या सोबत घेऊन गेलं हीच आपली संस्कृती आहे असही मत या दांपत्याचा आहे.एस.एन. कुलकर्णी या नावाने सर्व परिचित असलेले सेवानिवृत्त अभियंता नेहमीच काही ना काहीतरी उपक्रम राबवतात. स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरण करणारं हे पहिलं व्यक्तिमत्व! एवढेच नव्हे तर आजही स्मशानभूमी झाडून काढणारा देखील हे एकमेव व्यक्तिमत्व.
अशा व्यक्तिमत्त्वाला नियतीने देखील भरभरून दिलं आहे. दोन मुलं एक मुलगी असा सुखी संसार त्यांचा चालू आहे. परंतु दातृत्वाची त्यांची इच्छा अजूनही अपूर्णच आहे. मागेल त्याला मदत करणं ,शक्य तेवढं दान करणे हे या दांपत्याच काम. फक्त आपणच सुखी न होता शेजारी देखील सुखी झाला पाहिजे असं म्हणत अनेकांना आर्थिक ,मानसिक आणि इतर पद्धतीनेही मदत केली ती एस एन कुलकर्णी यांनी .नेहमी काही ना काही तरी उपक्रम करण्याच्या त्यांच्या छंदाने वयाच्या 80 व्या वर्षी देखील शांत बसू दिलं नाही .बारवाले महाविद्यालयाचे प्राध्यापक उद्धव थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे निवडक अग्रलेखन” या विषयावर विद्यापीठाला प्रबंध सादर केला आहे त्याचा लवकरच निकालही येणार आहे.
1964 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सिव्हिल ड्रॉप्समन म्हणून अभियंत्याची नौकरी त्यांनी सुरू केली. आणि सन 2000 मध्ये ते जालना सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले. त्यांनी केलेल्या या दानाच्या संकल्पच्या वेळी त्यांचे घनिष्ठ मित्र कांतराव शेलगावकर, अभय सहानी, सेवानिवृत्त शिक्षक श्री. जोशी यांची उपस्थिती होती.
पाच खोल्यांचं 2800 स्क्वेअर फुट हे सर्व सुविधांनी युक्त असलेलं घर जमीनदोस्त करून त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर वस्तीगृह बांधावं, असा त्यांचा मानस आहे. त्या बदल्यात त्यांना कुठलीही अपेक्षा नाही. या वस्तीगृहाचे नियोजन करताना त्यांनी 25 विश्वस्त घ्यावेत एका विश्वस्थाने पाच -पाच लाख रुपये द्यावेत. जेणेकरून ही इमारत लवकर पूर्णत्वास जाईल या बदल्यात त्यांना ना विश्वस्त पदाची अपेक्षा आहे ना अध्यक्ष पदाची. केवळ हा भाग महिलांसाठी सुरक्षित आहे आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे त्यामुळे इथे मुलींचे वस्तीगृह व्हावे असा मानस त्यांचा आहे .त्यांच्या या दातृत्वाला भरभरून पाठिंबा दिला आहे तो त्यांची पत्नी सौ. रंजनी कुलकर्णी यांनी .त्या म्हणतात “आपण त्यागी वृत्ती ठेवली पाहिजे. आमच्या घराण्यात दोन्हीकडे दातृत्वाची परंपरा आहे. ती आम्ही कायम ठेवली आहे. पुढे मुलांना पण याची जाणीव व्हावी आणि त्यांच्यात देखील दातृत्वाची वृत्ती यावी यासाठी आम्ही हे करत आहोत. दातृत्वाची वृत्ती येण्यासाठी पत्नीची पण जोड आवश्यक असते आणि ती पुढच्या पिढीमध्ये येईल”. अशी अपेक्षाही रंजनी कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
Dilip Pohnerkar-9422219172
Edtv Jalna News, App on play store,You Tube &
www.edtvjalna.com