जालना- खाजगी इस्पितळात अति दक्षता विभागात उपचार घेत असलेल्या पतीसाठी आवश्यक असणारे रक्त आणण्यासाठी गेलेल्या विवाहितेसोबत “असभ्य”वर्तन करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जालना येथील सामान्य रुग्णालयात दिनांक 27 आणि 28 सप्टेंबर असे दोन दिवस हा प्रयत्न झाला .दिनांक 27 तारखेला पतीची तब्येत महत्त्वाची असल्यामुळे या विवाहितेने दुर्लक्ष केले, याची संधी साधून पुन्हा दुसऱ्या दिवशी दिनांक 28 रोजी विवाहिते सोबत असभ्यवर्तन करण्याची हिम्मत वाढली. यानंतर या विवाहितेने कदिम जालना पोलीस ठाण्यात आपल्या काही सहकाऱ्यांसह तक्रार देण्यासाठी गेली असता गणपती विसर्जनामुळे तिची तक्रार घेतल्या गेली नाही. पर्यायाने तोपर्यंत ही बातमी रक्त संक्रमण तंत्रज्ञ असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या कानावर गेली आणि त्याने आपले नातेवाईकांसह या विवाहितेचा पती ज्या इस्पितळात भरती आहे तिथे जाऊन पाया पडून गयावया करू लागला, दरम्यान या विवाहित महिलेसोबत मोठे कोणी नसल्यामुळे ती देखील या प्रकारामुळे भेदरलेली होती आणि या परिस्थितीचा फायदा घेत पैशाचे आम्हीच दाखवत तिचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्याने केला .
पतीची तब्येत महत्त्वाची असल्यामुळे तिने हा प्रकार पतीला सांगितला नाही आणि काल पतीची दवाखान्यातून सुट्टी झाली आणि घरी गेल्यानंतर आज हा प्रकार या विवाहितेने पतीला सांगितला. आधीच आजारी असलेला पती आणखीनच मनस्तापामध्ये जळत आहे. झालेला प्रकार या विवाहितेने महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई यांना दिनांक 30 सप्टेंबर रोजी ईमेल द्वारे कळविला आहे .दरम्यान या संदर्भात रक्त संक्रमण विभागाचे अधिकारी डॉ. शेजुळ आणि प्रयोगशाळा प्रमुख डॉ.श्रीमती गरड यांच्याशी संपर्क साधला असता श्रीमती गरड म्हणाल्या, की कर्मचाऱ्याने चालता- चालता धक्का लागल्याचे सांगितले आहे ,काहीतरी घडले आहे परंतु लेखी तक्रार न आल्यामुळे पुढील कारवाई करण्याचा विषय नाही, तसेच यासंदर्भात तडजोड देखील झाली आहे.
हाच तो ईमेल जो विवाहितेने महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई येथे केला आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172