जालना- कोतवाल परीक्षेमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरून नियमबाह्य परीक्षा देणाऱ्या सुमारे दहा विद्यार्थ्यांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यापैकी आठ विद्यार्थी हे राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय परीक्षा केंद्रावरील आहेत आणि दोन विद्यार्थी हे श्री.सरस्वती भुवन हायस्कूल परीक्षा केंद्रावरील आहेत .दरम्यान यापैकी दोन जण फरार असून आठ जणांना दिनांक 10 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

जालना जिल्ह्यातील 69 कोतवाल पदांच्या परीक्षेसाठी सुमारे 19 परीक्षा केंद्रांवरून 5000 विद्यार्थ्यांनी काल परीक्षेसाठी हजेरी लावली. दरम्यान राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा हॉलमध्ये काही उमेदवारांकडे कानामध्ये बारीक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आढळून आले तर काही उमेदवारांनी गुप्तांगाच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक चिप लपवून नेली होती. त्यामुळे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बाहेर येत होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्या उमेदवारांना ताब्यात घेण्यात आले आहे. काल त्यांची चौकशी केल्यानंतर आज राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात गैरप्रकार केल्याच्या कारणावरून अंबड तहसीलचे अव्वल कारकून योगेश वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बैठक क्रमांक 020021,020078,020208,020011, ईश्वर कवडे राहणार पिरवाडी26, तालुका बदनापुर ,गजानन जारवाल 26 खडकवाडी, राजेंद्र सुंदरडे 26 राजेवाडी, अनिल सुलाने 22 वर्षे डावरगाव, आकाश बहुरे पिरवाडी, अर्जुन बहुरे सागरवाडी, किशोर कवडे पिरवाडी आणि युवराज इंदलसिंग बहुरे यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. दरम्यान श्री. सरस्वती भुवन प्रशालेमध्ये आसन क्रमांक030117 या जागेवर तोतया परीक्षा देणाऱ्या दोघाजणांविरुद्ध या शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक उदय भगवानराव टाकसाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकाश ज्ञानेश्वर गायकवाड भोकरवाडी, तालुका जालना आणि लखन इंदरसिंग जारवाल बेंबळ्याची वाडी कचनेर तालुका संभाजीनगर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भादवि कलम 419, 420, 471 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणाचे तपासिका अधिकारी भगवान नागरे यांनी या आरोपींना न्यायालयात उभे केले असता दिनांक 10 पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version