जालना विविध कारणांमुळे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आज पकडले आहे, आणि त्यांच्याकडून 15 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केला आहे.
समृद्धी महामार्गावर अनेक अवजड वाहने कधी नाळदुरुस्तीमुळे तर कधी विश्रांतीसाठी थांबलेली असतात. याचा फायदा घेऊन या वाहनांच्या डिझेल टाकीमध्ये नळी टाकून डिझेल काढणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. अशा वाहनांमधून डिझेल काढून घेतल्यानंतर हे वाहन पुढे जात असल्यामुळे नेमके डिझेल कुठे चोरला गेले? याचा अंदाज चालकांना येत नव्हता, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार समृद्धी महामार्गावर होत असल्याची कुन-कुन स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना लागली होती. त्या अनुषंगाने या शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या पथकाने या डिझेल चोरीचा छडा लावला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रामनगर साखर कारखाना येथे राहणाऱ्या राहुल राजाभाऊ कदम हा त्याच्याकडे असलेल्या एका कारच्या माध्यमातून ही डिझेल चोरी करत होता .वाहना मधून कॅन मध्ये काढलेले डिझेल तो या कारच्या माध्यमातून इतरत्र नेत होता. त्याला प्रशांत गणेश गायकवाड व 23 वर्षे राहणार कोळघर शेकटा,तालुका छत्रपती संभाजी नगर हल्ली मुक्काम रामनगर झेंडा चौक मुकुंदवाडी, बाळू दगडोबा खिल्लारे वय 27 वर्ष राहणार टाकळी बाजार तालुका भोकरदन, राजेंद्र सुरेश गवळी व 27 वर्ष राहणार मुकुंद नगर छत्रपती संभाजी नगर आणि रवी ज्ञानेश्वर कदम वय 20 वर्ष राहणार जळगाव सोमनाथ तालुका जालना .यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून डिझेल चोरीसाठी वापरलेली दोन वाहने, 97 लिटर डिझेल असा एकूण 15 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, राजेंद्र वाघ ,यांच्यासह पोलीस कर्मचारी गोकुळसिंग कायटे, भाऊराव गायके, कृष्णा तंगे, लक्ष्मीकांत आडेप, गोपाल गोशिक, यांनी ही कारवाई केली.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172