जालना- आताच्या परिस्थितीमध्ये नवीन विवाह झालेल्या विवाहितांमध्ये संयम कमी झाला आहे आणि अपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे प्रेमाची संकल्पनाच बदलली आहे. किरकोळ कारणामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. हे थांबविण्यासाठी संयम वाढवून अपेक्षा कमी केल्या पाहिजेत तरच घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल .त्याच्याजोडीला  व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजेच मूल्याधिष्ठित शिक्षण रुजविले पाहिजे. असे मत महिला व बालकल्याण समिती सदस्य सौ. विद्या लकें -कानडे यांनी व्यक्त केले आहे .बालपणी कुमारिका भोजन झाल्यानंतर शेवटच्या दिवशी फ्रॉक मिळावा म्हणून कुमारी का भोजनासाठी जात होते अशी कबुलीही त्यांनी दिली आहे. Edtv News  नवरात्रोत्सवाच्या “रणरागिणी 2023” मध्ये पाचवे पुष्पगुंपताना सौ. विद्या कानडे बोलत होत्या.

रणरागिणीला प्रतिक्रिया द्या-91 94037 50312

edtv news” रणरागिनी 2023″ पहा रविवारपासून रोज सकाळी 7 वा. सुरू झाली आहे .रुबाब  दाखविण्यासाठी कोण झाली पोलीस,कोणाला आवडते लाल गोड सेव,कोणती युवती झाली कीर्तनकार,कोण देतं त्या 5 मिनिटांची धमकी….आणि बरंच कांही.

पदुत्तर शिक्षण, मास्टर ऑफ सोशल वर्कर, बी.एड ,असे उच्च शिक्षण घेऊन राज्यपाल नियुक्त पद असलेल्या महिला व बालकल्याण समितीवर त्या कार्यरत आहेत .पळून गेलेली बालके, बाल भिक्षेकरी पीडित महिला, यांचे समुपदेशन त्या करतात आणि पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात या बालकांचे किंवा महिलांचे पुढे काय करायचे ?याचा निर्णय जी समिती घेते.  त्या समितीचा एक भाग सौ. कानडे आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे. त्याला कारण म्हणजे गरिबी आणि शिक्षणाचा अभाव असल्याचे ते म्हणतात. यावर मात करण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण रुजविले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले .महिलांनी स्वावलंबी व्हावे त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, असे सांगतानाच त्या म्हणाल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. संयम कमी झाला आहे, प्रत्येक तरुणीला आपला पती धन दांडगा असावा, पैशावाला असावा असे वाटते आणि यातून वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत आणि संयमय ठेवल्या जात नाही त्यामुळे छोट्या छोट्या कारणांमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून या किरकोळ कारणांमध्ये डीपीला माझा फोटो ठेवला नाही, स्टेटस ठेवले नाही, इतरांचे का ठेवले ?अशी किरकोळ कारणे आहेत. त्यामुळे तरुणींनी संयम बाळगावा आणि अवास्तव अपेक्षा न ठेवता ज्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात अशाच अपेक्षा कराव्यात असा सल्लाही विद्या कानडे यांनी दिला आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version