नांदेड- नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या गोविंद गंगाराम मुंडे या पोलीस शिपायाने स्वतःच्याच अंगावर गोळी झाडून घेत बुधवार दिनांक 25 रोजी आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा नांदेड पोलीस तपास करीत आहेत आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजले नाही.
गोविंद मुंडे हे नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉ. ऋतुराज जाधव यांचे अंगरक्षक होते. काल दिनांक 25 रोजी गोविंद मुंडे ते नांदेडहून त्यांच्या घरी उस्माननगर येथे जात असताना उस्माननगर ते कलंबर जाणाऱ्या रस्त्यावर एका झाडाखाली ते थांबले आणि स्वतः जवळ असलेला पिस्तूल हनवटीला लावलाआणि त्यामधून गोळी झाडली. ही गोळी सरळ मेंदूच्या बाहेर निघाली असे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान गोविंद मुंडे यांनी का आत्महत्या केली याचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजले नाही.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172