परतूर- परतुर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातून तूर आणि कपाशीमध्ये पिकवलेला सुमारे 15 लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
परतूर तालुक्यातील येनोरा येथील लक्ष्मण निवृत्ती बोराडे या शेतकऱ्याच्या शेतातील कापूस व तुरीच्या पिकांमध्ये गांजा पिकविण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बुधवंत यांनी आपले पथक आणि आष्टी पोलिसांसह परतूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन या शेतात धाड टाकली.
यावेळी कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये लावण्यात आलेली गांजाची जवळपास 150 ते 175 लहानमोठी झाडे आढळून आले आहेत. पंचनामा करून ही झाडे उपटून घेण्यात आली असून, ती जप्त करण्यात आली आहेत.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत, आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि. सोमनाथ नरके, सहायक फौजदार मुंडे, पोहवा. राठोड, राजु काळे, पोकाँ. शुभम ढोबळे, पांढरे, सज्जन काकडे, लोखंडे, इम्रान तडवी आदींनी ही कामगिरी केली .
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
–9422219172