जालना- 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतंत्र भारत पक्षाच्याने कंबर कसायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट आणि त्यांचे सहकारी आज जालना जिल्हा दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठकही घेतली आणि त्यानंतर पत्रकारांसोबत निवडणुकी संदर्भात बोलताना सूचक विधानही केलं

आजच्या परिस्थितीमध्ये स्वतंत्र भारत पक्षाची परिस्थिती बिकट आहे ?चळवळी बंद झाल्या आहेत? संघटनेमध्ये केवळ वयोवृद्ध कार्यकर्ते राहिले आहेत ,जे काही करू शकत नाहीत आणि तरुणांची फळी सोबत नाही. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी तरुणांची फळी सोबत नाही हे मान्य केले असले तरी वयोवृद्ध कार्यकर्ते आजही सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासोबत राजकीय समीकरणांसंदर्भात  बोलताना वेळ पडली तर कोणासोबत जाणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनिल घनवट यांनी सूचक दिले आहे. गरज पडल्यास लहान चोर मोठ्या चोराची मदत करतो त्याप्रमाणे तसेच परिस्थिती आली तर केंद्रात सत्तेत बसलेल्या मोठ्या चोरासोबत जाऊ! असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. परंतु शक्यतो आम्ही सर्व निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

आजच्या या बैठकीमध्ये  स्वतंत्र भारत पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी पुंजाराम सुरंग यांची निवड करण्यात आली आहे, या बैठकीला स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला  आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती सीमा नरोडे, माजी अध्यक्षा गीता खांडेभराड, जालना तालुकाध्यक्ष रेणुका चोखनफळे, यांच्यासह डॉ.अनिरुद्ध भानुसे, उत्तमराव काळे, दिनकर तौर ,गजानन भांडवले, विश्वंभर भानुसे, बाबुराव गोल्डये,  संताराम राजबिंडे ,विष्णु शिंदे ,दीपक आनंदे, संतोष चव्हाण आदि शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version