जालना- परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसह इतरही अन्य काही मागण्या संदर्भात समस्त ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करत दीपक रणनवरे यांनी दिनांक 28 पासून जालना येथे आमरण उपोषण सुरू केले होते .दरम्यान कालपासून त्यांची प्रकृती खालावल्यानंतर शासन दरबारी तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि पालकमंत्री अतुल सावे यांनी देखील तातडीचे पत्र पाठवून दिनांक 13 डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावल्याचे सांगितले होते. परंतु त्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या कोणालाही प्रतिनिधित्व नसल्यामुळे समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत हा लढा पुढे चालूच ठेवला होता. आज दिनांक पाच रोजी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांनी मध्यस्थी करून दिनांक 13 डिसेंबरच्या बैठकीसाठी ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधीला निमंत्रण दिल्यामुळे आज आठव्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आले.

            यासंदर्भात अधिक बातम्या पहा

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

 

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version