जालना -गर्भवती महिलेचा खून केल्याप्रकरणी सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एम मोहिते यांनी सुनावली आहे. दिनांक 9 ऑगस्ट 2020 रोजी ही घटना घडली होती.
जालना शहरात काजीपुरा भागात राहणाऱ्या सय्यद माजिद सय्यद कयूम तांबोळी हे त्यांच्या परिवारासह एका खोलीमध्ये झोपले होते. दिनांक 9 ऑगस्ट 2020 रोजी या प्रकरणातील आरोपी निलोपर जाफर खान राहणार वल्ली मामू दर्गा, नशीमाबी जाफरखान ,अरबाज खान जाफर खान, इस्माईल उर्फ शक्ती अहमदशहा, हलीमा बी उर्फ हल्लो धुमअली शहा राहणार काजीपुरा, शबाना धूमअली शहा यांनी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास तक्रारदाराच्या घरात घुसून तक्रारदार सय्यद माजिद याच्यासह त्याच्या लहान मुलांना आणि गर्भवती पत्नीला मारहाण केली. लोखंडी गजाने मारले यामध्ये हिना खान या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणामध्ये एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुरावे आणि विरोधी पक्षाचे युक्तिवाद तपासल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एम. मोहिते यांनी या प्रकरणातील आरोपी निलोफर जाफरखान, नसीमा बी जाफरखान, अरबाज खान जाफर खान, इस्माईल उर्फ शक्ती अहमद शहा ,हमीलाबी उर्फ हल्लो धुमअली या सहा जणांनी गर्भवती महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वरील सहा जणांना खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर कलमान्वये एक वर्ष शिक्षा व एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोग्यता भारत खांडेकर यांनी काम पाहिले.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com