जालना- परतूर शहरातून सर्वम विशाल औटी हा पाच वर्षाचा मुलगा दिनांक 14 रोजी बेपत्ता झाला आहे. यासंदर्भात सर्वम च्या मामांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.
देशपांडे गल्लीत राहणारे रवी देशपांडे यांच्याच घराजवळ विशाल औटी हे राहतात. सर्वम हा रवी देशपांडे यांचा भाचा आहे. दिनांक 14 रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास सर्वम गल्लीमध्ये खेळत होता मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी आलाच नाही. त्यामुळे गल्लीमध्ये आणि इतर नातेवाईकांकडे सर्वम चा शोध घेतला असता तो कुठेही दिसून आला नाही .त्यामुळे सर्वम बेपत्ता झाल्याची सर्वांची खात्री झाली आणि रवी देशपांडे यांनी परतुर पोलीस ठाण्यात सर्वम बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. वरील छायाचित्रातील मुलगा कोणाला दिसल्यास परतूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172