जालना- पौंष शुक्ल द्वादशी विक्रम संवत 2080, सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येमध्ये श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात येणार आहेत .या सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी आयोध्ये मधून आलेला कलश सध्या सर्व मंदिरांमध्ये फिरत आहे .या कलशातील अक्षदा भाविकांना देऊन जवळच्या श्रीराम मंदिरात या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करावा, तसेच ज्याप्रमाणे दिवाळी उत्सव साजरा करतो त्याप्रमाणेच या दिवशी घरावर विद्युत रोषणाई, दारासमोर रांगोळ्या काढून जयघोषामध्ये हा उत्सव साजरा करावा असे आवाहन भाविकांना अक्षद वाटप करून करण्यात येत आहे.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्थापित श्रीराम संस्थान आनंदवाडी येथून या अक्षद वाटपाला बुधवार दिनांक 3 रोजी सायंकाळच्या उपासनेनंतर प्रारंभ करण्यात आला आहे. दररोज 15 जानेवारी पर्यंत विविध भागांमध्ये जाऊन या अक्षदांचे वाटप होणार आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172