जालना -केवळ मराठवाडा, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात एकमेव असलेल्या चतुर्वेदेश्वर धाम सावरगाव (ता.परतूर,जि. जालना) येथील विश्वस्त तथा पुरोहित वेदशास्त्र संपन्न देशीक शास्त्री कस्तुरे यांची श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेसाठी होणाऱ्या धार्मिक विधीचे पौरोहित्य करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही एक भूषणावह बाब आहे. श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेचा एक भाग असलेल्या चारी वेदांच्या स्वाहाकारासाठी ते नुकतेच अयोध्येमध्ये जाऊन आले आहेत. या विधीसाठी महाराष्ट्रातून आठ रोहितांची निवड केली होती त्यामध्ये देशी कस्तुरी शास्त्री हे एक होते.
सावरगाव येथे ब्रह्ममहर्षी महामोहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, आणि अथर्ववेद म्हणजेच चतुर्वेदेश्वराची स्थापना करून गुरुकुल पद्धतीने इथे वेदशास्त्र संपन्न पुरोहित घडविले आहेत आजही इथे धार्मिक शिक्षण सोबतच शैक्षणिक शिक्षण दिले जाते. त्यासोबतच गोशाळा देखील चालवल्या जाते.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172