जालना- साधारणतः 30 वर्षांपूर्वी श्रीदेवी आणि जितेंद्र या अभिनेत्यांच्या “हिंम्मतवाला” या चित्रपटाच्या गाण्याने तरुण वयाला भुरळ घातली आणि एक चांगला कलाकार पुढे आला. श्रीदेवीच्या “नैनो मे सपना,सपनो में सजना…” या गाण्यामुळे भरतनाट्यमच्या माध्यमातून एक नृत्यांगना पुढे आली आहे एवढेच नव्हे तर ती ही कला पुढे चालवत आज चेन्नई मधून विशेष प्राविण्य मिळविले आहे .अपूर्वा वासडीकर असे या कलाकाराचे नाव आहे.

संगीत आणि नृत्य क्षेत्र हे कधी कोणाला भुरळ घालील आणि कोणाला वेड लावील हे काही सांगता येत नाही. तीस वर्षांपूर्वी श्रीदेवीच्या या गाण्याची मैत्रिणींनी एकत्र येत पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती केली. तिच्या या नृत्याने कधी मनावर भुरळ घातली हे कळलच नाही. त्यामुळे तामिळनाडूच्या भरतनाट्यम क्षेत्राकडे वळल्या गेले. एवढेच नव्हे तर या क्षेत्रातील अधिकृत शिक्षण घेत आज विशेष प्राविण्य मिळविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तामिळनाडूतीलच हा नृत्य प्रकार जालन्यात शिकले ,एवढेच नव्हे तर क्लासेस घेत या विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चेन्नई येथे नेले आणि उत्कृष्ट सादरीकरण करत या विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. त्यामुळे गेल्या 23 वर्षांपासून सुरू असलेला हा भरतनाट्यम नृत्याचा एक प्रकार आयुष्याला नवीन वळण देणारा ठरला आहे”.असं मत गेल्या 23 वर्षांपासून भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेत घेत प्रशिक्षण देणाऱ्या अपूर्वा वासडीकर यांनी व्यक्त केला आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version