जालना -जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे वाढते प्रमाण हे पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बीड जिल्ह्यातील नागापूर -पिंपळनेर रोडवर असलेल्या एका ढाब्यावर जेवण करत असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे पोलिसांच्या भाषेत चौकशी केली असतात त्याच्याकडून सात चोरी केलेल्या मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे बांदरवाडा भागात राहणाऱ्या गणेश काशिनाथ गायकवाड वय वर्ष 24 याचा वर्षभरापूर्वी प्रेम विवाह झाला. पत्नीला घेऊन तो पुणे येथे पिंपरी चिंचवड येथे राहत होता. पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी तो जालन्यात यायचा मोटरसायकल चोरी करायचा आणि बीड जिल्ह्यातील नागापूर येथे राहणाऱ्या इमरान इसाक पठाण वय 37 वर्ष याच्या मार्फत तो विकायचा. गेला अनेक वर्षांपासून त्याचा हा उपक्रम सुरू होता. सुमारे वर्षभरापूर्वी परभणीच्या स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी देखील या प्रकरणात त्याला अटक केली होती.

आता सध्या जालना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी वरील दोघांनाही अटक केली आहे आणि त्यांच्याकडून क्रमांक नसलेल्या सात विविध कंपनीच्या मोटरसायकल जप्त केल्या आहेत. त्या मोटार सायकल कोणाच्या आहेत हे इंजिनच्या क्रमांकावरून तपासण्याचे काम सुरू आहे .ज्या मोटर सायकल जप्त केल्या आहेत त्यांचे इंजिन क्रमांक खालील प्रमाणे आहेत संबंधितांनी जालना येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

ही कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हाशाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, लक्ष्मीकांत आडेप, देविदास भोजने, कैलास चेके, सुधीर वाघमारे, संजय सोनवणे आदींनी सहकार्य केले.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version