जालना -चंदनझीरा भागामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये जीव वाचवण्यासाठी पळालेल्या तक्रारदारावर आरोपींनी हल्ला करून त्याला जखमी केले आहे. दरम्यान चंदंनाझीरा पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप पर्यंत फरार आहे.
या प्रकरणातील तक्रारदार सचिन कैलास गायकवाड वय बावीस वर्षे राहणार चंदनझिरा हा रात्री 11:00 च्या सुमारास इंद्रायणी चौकामध्ये मित्रांसोबत कुल्फीच्या गाडीवर थांबून लस्सी पीत असताना चंदन झीरा भागात असलेला एकता चौकात राहणारा अजहर शेख हा तिथे आला आणि शिवीगाळ करू लागला. त्यासोबत त्याने त्याच्याजवळ असलेल्या पिस्टल मधून सचिन गायकवाड यांच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या झाडल्या परंतु पिस्टल मधील गोळी खाली पडल्याने आजहर पडलेली गोळी उचलून घेत असताना सचिन आणि त्याच्या मित्राने तेथून पळ काढला. ते इतरत्र अंधाराचा फायदा घेऊन लपल्यानंतर शेख अजहर शेख अब्दुल, शेख अश्फाक शेख लाला, शेख अजम शेख मुनाफ, शेख मुख्तार शेख नबी ,गुलजार खान रहीसखान, शेख अकबर शेख अब्दुल ,शेख सद्दाम शेख रशीद, शेख एजाज शेख इस्माईल, शेख वसीम शेख नसीम ,शेख इरफान शेख इस्माईल, यांच्यासह अन्य काही चार-पाच लोक लोकांनी सचिन गायकवाड व त्याच्या मित्राला शोधून काढले आणि लोखंडी स्टीलच्या रोडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला .यामध्ये सचिन गायकवाड जखमी झाला आहे .दरम्यान चंदनझिरा पोलिसांनी या प्रकरणातील आठ आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप पर्यंत फरार आहे.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com