जालना- शहरापासून जवळच असलेला घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशय आजही जालनेकरांची तहान भागवतो .निजाम काळातील या जलाशयाची आज दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन या दोघांपैकी कोणाच्या मालकीचा हा तलाव आहे हेच कोणी सांगायला तयार नाही. त्यामुळे या तलावाची दुरुस्ती करायची कोणी? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे? या तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाला सुबुद्धी दे! असे म्हणत शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी या तलावाच्या दुरावस्था झालेल्या सांडव्यावर बसून हनुमान चालीसाचे पठण केले.
कोणताही विजेचा खर्च न करता आजही या तलावातून आठ किलोमीटर पाणी उताराने जालना शहरात येते. निजामाच्या काळात अत्याधुनिक पद्धतीने बांधलेला हा तलाव आजही जालनेकारांची तहान भागवण्यासाठी सक्षम आहे. परंतु सांडव्याची दुरावस्था झाल्यामुळे दोन वर्षात जर याची दुरुस्ती केली नाही तर या सांडव्यातून पूर्ण पाणी वाहून जाईल आणि तलाव कोरडा पडेल अशी भीती पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी रघुनाथ कल्याणकर यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक संस्था या तलावाची दुरुस्ती करा म्हणून वारंवार निवेदन देऊन थकल्याआहेत आणि ओरडून घसा ही कोरडा पडला आहे. परंतु प्रशासनाला याचा काहीच फरक पडेना. अधिकारी येतात आणि जातात परंतु पिण्याचा प्राण्याचा प्रश्न हा इथे राहणाऱ्या नागरिकांना भेडसावणारा आहे. त्यामुळे शेवटी सामाजिक जबाबदारी घेऊन सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक नागरिक यांनी एकत्र येत हा तलाव दुरुस्त करण्याची जबाबदारी देखील स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे .परंतु ती जबाबदारी देणार तरी कोण? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे .म्हणूनच की काय आता संकट मोचन बजरंगबलीलाच या कार्यकर्त्यांनी साकडे घातले आहे आणि देवा बजरंगा! या प्रशासनाला सुबुद्धी दे, एक तर तलाव दुरुस्त करून दे किंवा तलाव दुरुस्त करण्याची परवानगी दे असे म्हणत हनुमान चालीसा पठण करून बजरंगाची स्तुती केली आहे आणि साकडे घातले आहे .या हनुमान चालीसा पठणाला,सुनिलभाई रायठठ्ठा, प्रविण पवार, राजेभाऊ मगर, बद्रिनाथ जाधव, डाॅ प्रतिभा श्रीपत, सुभाष पारे, जगन वाघमोडे,सचीन टापरे, संयम कवडे यांची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172