भोकरदन- 20 हजारांच्या मागणीनंतर 12 हजारावर तडजोड करून लाच स्वीकारणाऱ्या भोकरदन तहसीलच्या महिला तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
आज दि.25 रोजी भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथील एका शेतकऱ्याचे त्याच्या वडीलाच्या नावावर गट क्रमांक 215 मध्ये एक हेक्टर 50 आर जमीन आहे. ही शेतजमीन वाटणी पत्रानुसार तक्रारदाराची आई आणि तक्रारदाराच्या नावावर करण्यासाठी चांदई एक्कोच्या तलाठी श्रीमती कल्पना पंजाबराव काळमेघे वय 35, राहणार शिवाजीनगर देऊळगाव राजा ,जिल्हा बुलढाणा. यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराची लाच देण्याची तयारी नसल्यामुळे त्यांनी लगेचच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याशी संपर्क साधला. या तक्रारीची तत्पर दखल घेत या विभागाने पंचासमक्ष सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये राजूर येथे तक्रारदाराकडून बारा हजार रुपयांची तडजोडी आणती रोख रक्कम घेताना चांदई एक्को सज्याच्या तलाठी कल्पना काळमेघे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे .यासंदर्भात हसनाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==-दिलीप पोहनेरकर,9422219172