केज(बीड)- अनैतिक संबंधातून एका व्यक्तीचा खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी केज पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या अपघातात वापरलेला ट्रक जालना येथील औरंगाबाद चौफुली भागात असलेल्या एका खाजगी वाहन तळामध्ये आणून लावण्यात आला होता. त्यावेळी पासून हा ट्रक इथेच उभा होता. खुनाचा तपास पूर्ण झाल्यानंतर आज दिनांक चार रोजी या खाजगी वाहन तळामधून पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांनी हा ट्रक ताब्यात घेऊन केजला नेला आहे.
यासंदर्भात केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 मार्च 2024 रोजी केज तालुक्यातील पिंपळगाव ते विडा रस्त्यावर एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसला .त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी दिनांक 30 मार्च रोजी रुग्णालयात असताना ओळख पटविण्यासाठी गप्पेवाडी येथील सखुबाई दत्तात्रय केदार या आल्या होत्या . त्यांनी या मृतदेहाची ओळख पटवली .दत्तात्रय केदार हे सखुबाई यांचे पती होते. ओळख पटल्यानंतर सखुबाईंनी घातपाताची शक्यता व्यक्त करत केज पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम 302 अन्वये गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्याकडे हा तपास देण्यात आला.
प्रथमदर्शनी घटनास्थळावर मृतदेह पाहिल्यानंतर हा अपघात असावा अशीच परिस्थिती होती आणि पोलिसांना देखील तसेच वाटले होते. परंतु सखुबाईने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू झाला. पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली आणि गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणातील मुख्य आरोपी विलास उत्तम केदार, विकास मधुकर केदार व परमेश्वर धोंडीबा चौरे यांना धाराशिव जिल्ह्यातून ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली असता या प्रकरणातील एका आरोपीच्या पत्नीचे आणि मृत दत्तात्रय केदार याचे अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे वरील तिघांनी शांत डोक्याने कट रचला आणि दत्तात्रय केदार याला विश्वासात घेऊन एका निर्जन ठिकाणी बोलावले दारू पाजली आणि त्याला ठार मारले. अपघाताचा बनाव करण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरून ट्रक घातला त्यामुळे मृत केदार याचा चेहरा चेंदामेंदा झाला होता . ओळख देखील लवकर पटत नव्हती. केदार याचा मृतदेह ओळखायला येऊ नये म्हणून आरोपींनी पूर्ण काळजी घेतली होती परंतु सखुबाईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने याची दखल घेऊन हा तपास लावला आहे. आरोपींना केज न्यायालयात उभे केले असता दिनांक सात पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172