बीड- बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेने आणि केज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत” झुकेगा नाही साला” म्हणणाऱ्या “पुष्पाचा” भांडाफोड केला आहे. या पुष्पावर यापूर्वी देखील अंबाजोगाई आणि बर्दापूर येथे चंदन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
केज ते धारूर रस्त्यावर चंदन चोरीचा ट्रक जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी संयुक्त कारवाई केली. धारूर रस्त्यावर असलेल्या नेहकर यांच्या पेट्रोल पंपा समोर रात्री आयशर क्रमांक एम एच 24 ए यु 93 83 हा उभा असलेला दिसला. पोलिसांनी चालकाला विश्वासात घेऊन त्याची माहिती घेतली असता प्रियतम काशिनाथ साखरे वय वर्ष 34, राहणार गुरुवार पेठ अंबाजोगाई आणि त्याचा सहचालक शंकर पंढरी राख राहणार कवडगाव तालुका केज असे असल्याचे सांगितले. आयशर गाडीमध्ये रिकाम्या कॅरेटच्या समोर चंदनाच्या गाभ्याची लाकडे भरलेल्या गोण्या आहेत असेही सांगितले .ही लाकडे बालासाहेब दत्तात्रय उर्फ बालाजी जाधव राहणार केज यांच्या सांगण्यावरून जालन्याकडे घेऊन जात असल्याचेही तो म्हणाला. पोलिसांनी या आयशरची तपासणी केली असता पुष्पा चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे चंदन लपविण्यासाठी चोरकप्पा केलेला होता तसाच कप्पा या आयशर गाडीमध्ये देखील दिसून आला. एक हजार दोनशे पस्तीस किलो वजनाचे हे चंदन याची बाजारात एक कोटी 97 लाख 68 हजार एवढी किंमत आहे. पोलिसांनी चंदन आणि आयशर गाडी जप्त केली आहे .दत्तात्रय उर्फ बालाजी जाधव याच्यावर यापूर्वी देखील बर्दापूर आणि अंबाजोगाई येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत .जप्त केलेल्या चंदनाची बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, स्थानिक गुना शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे ,पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी पाहणी केली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172