जालना- मतदारांनो पुढील दोन दिवस सावध रहा कारण समोरचा माणूस…. असे आवाहन जालना लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी केले. डॉक्टर काळे यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेचे जाणण्यात आयोजन करण्यात आले होते परंतु हवामान खराब असल्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर येऊ शकले नाही असे आयोजकांचे वतीने सांगण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
देशातील 22 उद्योगपतींना 16 लाख कोटींच कर्ज माफ करणाऱ्या मोदी सरकाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे मात्र साफ दुर्लंक्ष केले आहे. शेतकरी विरोधी आणि बेरोजगारी, महागाई, कामगारांसह सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या या सरकारला पाय उतार करण्यासाठी देशातील जनता सज्ज झाली असून आगामी काळात निश्चितपणे इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा ठाम विश्वास राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केला. जालना लोकसभा मतदार संघात महाविकास (इंडिया) आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शहरातील डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या आज शुक्रवारी दुपारी आयोजीत करण्यात आलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर अ.भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशीष दुवा, माजी मंत्री आ. अमित देशमुख, राजेश टोपे, खा. चंद्रकांत हंडोरे, आ. राजेश राठोड, आ. मोहनराव हंबरडे, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, जालना जिल्हा प्रभारी नामदेवराव पवार, विलासराव औताडे, शब्बीर अंसारी, बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडकर, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, मा. आ. शिवाजीराव चौथे, चंद्रकांत दानवे, संतोष सांबरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव अंबेकर, एकबाल पाशा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, कॉ. अण्णा सावंत, आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, जि. प. चे मा. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सतिष टोपे, माजी नगराध्यक्ष बबलु चौधरी, राकाँचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, भानुदास घुगे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नबी शिपोरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com