जालना- लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ही प्रचंड घसरली आहे. ती वाढवण्यासाठी शासकीय यंत्रणा आपल्या परीने प्रयत्न करतच आहे. आणि आज मतदानाच्या पूर्वसंध्येला लोकप्रतिनिधी देखील आपल्या परीने “प्रलोभन” दाखवत ही टक्केवारी वाढवण्याचे प्रयत्न करणारच आहे . परंतु एकदा मतदान झाल्यानंतर त्या मतदाराची कोणी चौकशी केली आहे का? नाही ना !परंतु मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिल्यानंतर या प्रोत्साहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल त्याच्यासाठी खास ऑफरही एका डॉक्टरने आणली आहे.  मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवा आणि मोफत आरोग्य तपासणी करा. अन्य वेळी किमान तपासणी फी म्हणून 200 रुपये द्यावे लागतात परंतु  तुम्ही जर उद्या दिनांक 13 रोजी मतदान केले असेल तर दिनांक 14 रोजी दिवसभरामध्ये कधीही निरामय हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या बोटाची शाई दाखवून मोफत तपासणी करून घेऊ शकता. ही ऑफर मतदान केलेल्या सर्वांसाठीच खुली आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणा ठरवून दिलेल्या नियोजनानुसार काम करत होती. जालना विधानसभा मतदारसंघांमध्ये आज दुपारी एक वाजता पहिली बस रवाना झाली. या बस मध्ये मतदान साहित्य आणि कर्मचारी होते. गोंदेगाव जामवाडी श्रीकृष्ण नगर या मतदान केंद्राची ही बस होती. उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ, तहसीलदार छाया पवार, जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, नायब तहसीलदार श्री घुगे आदींची यावेळी उपस्थिती होती.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version