जालना- जालना लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 13 मे रोजी मतदान झाले .13 मे रोजी झालेल्या मतदानाची सायंकाळी सात वाजेपर्यंत ची आकडेवारी ही 66% होती परंतु काही मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे आज सकाळी ही आकडेवारी आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ यांनी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 69.18% एवढे मतदान झाले आहे.

जिल्ह्यात एकूण 19 लाख 67 हजार 554 मतदार होते. त्यापैकी 13 लाख 61 हजार 217 मतदारांनी आपला हक्क बजावला. सर्वात जास्त मतदान हे भोकरदन विधानसभा मतदारसंघात झाले. ते 74.25% आहे. तर सर्वात कमी मतदान हे जालना विधानसभा मतदारसंघात झाले आहे ते म्हणजे 60.90टक्के.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172