घनसावंगी – घर बांधकामासाठी गृह कर्ज घेताना लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेसह इतर खर्च म्हणून 5000 रुपये घेताना घोंसीचा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक जाळ्यात अडकला आहे.

घनसावंगी तालुक्यातील घोंसी येथील एका ग्रामस्थाला स्वतःसाठी, त्याच्या मित्रासाठी आणि मामाच्या मुलासाठी अशा एकूण तिघांसाठी घर बांधकाम सुरू करायचे होते .त्यासाठी महिंद्रा फायनान्स चे गृह कर्ज घ्यायचे होते परंतु हे गृह कर्ज घेत असताना ग्रामपंचायतचे काही ना हरकत प्रमाणपत्र देखील आवश्यक होते. या प्रमाणपत्रांची नियमानुसार ग्रामसेवकाकडे मागणी केली. घोंसीचे ग्रामसेवक लक्ष्मीनारायण नरसिंगराव यमूल वय पन्नास वर्ष ,(वर्ग तीन) राहणार जयराज रेसिडेन्सी, भागवत कॉलनी जालना .यांनी प्रत्येकी दीड हजार रुपये असे एकूण साडेचार हजार  आणि इतर खर्च म्हणून पुन्हा पाचशे रुपये. अशा एकूण पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला या विभागाने तक्रारीची शहानिशा करून गुरुवार दिनांक 30 रोजी जालना येथील अंबड चौफुली भागात असलेल्या शिवनेरी हॉटेल जवळ सापळा रचला. यावेळी ग्रामसेवक लक्ष्मीनारायण यमुल याला तक्रारदाराकडून 5000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आणि रंगेहात पकडले. या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यामध्ये ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version